(Source: Poll of Polls)
Harshwardhan Sapkal: पुण्यातील गुन्हेगारीमागे भाजप अन् अजित पवारांची राष्ट्रवादी; काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप
Harshwardhan Sapkal on Pune crime : पुण्यामधील वाढत्या गुन्हेगारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केलाय.Harshwardhan Sapkal

Harshvardhan Sapkal अकोला : पुण्यामधील वाढत्या गुन्हेगारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला बळ देणारा 'दादा' कोण?, असा सवाल त्यांनी केलाय. ते अकोला येथे बोलत होते. काँग्रेसच्या अमरावती विभागाच्या आढावा बैठकीसाठी ते अकोल्यात आले होते. गुंड निलेश घायवळला चंद्रकांत पाटलांची (Chandrakant Patil) मदत असल्याच्या शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकरांच्या आरोपांवर ते बोलत होते. पुण्यातील गुन्हेगारीच्या पाठीशी भाजप आणि अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी असल्याच्या आमच्या आरोपाला धंगेकरांच्या आरोपामुळे पुष्टी मिळाल्याचं ते म्हणालेय.
दरम्यान, एकनाथ शिंदेंचं मोठेपण होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाचा शिधा योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचंही ते म्हणाले. यानंतरचा टप्पा हा लाडकी बहीण योजना बंद करण्याचा राहणार असल्याचा ते म्हणाले. दरम्यान, बिहार निवडणुकीत भाजपला पळता भुई थोडी होणार. तर काँग्रेसमधील सर्व वरिष्ठ नेते आपल्या सोबत असल्याचाही त्यांनी आवर्जून सांगितलंय.
Harshwardhan Sapkalon Bihar Elections: बिहार निवडणुकीत भाजपला पळता भुई थोडी होईल
बिहारच्या निवडणुकीत मोठे जनआंदोलन उभे राहील. बिहार निवडणुकीत भाजपला पळता भुई थोडी होईल. राहुल गांधींच्या बिहारमधील जनता यात्रेला अलोट प्रतिसाद मिळतो आहे. राहुल गांधींनी दिलेला 'वोट चोर, गद्दी छोड' हा नारा बिहारच्या निवडणुकीत प्रभावीपणे काम करेल. असा विश्वासही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
Harshwardhan Sapkal on Chandrakant Patil: पुण्यामधील गुन्हेगारीमागे कोणता 'दादा'?
पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ड्रग्ज विकणाऱ्याला कोणी मदत केली? हे महाराष्ट्रासमोर उघड आहे. पुण्यामधील वाढती गुन्हेगारी आणि कोयता गॅंगच्या पाठीमागे कोणता 'दादा' आहे? हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं. पुण्यातील गुन्हेगारीला भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जबाबदार आहे, या आमच्या आरोपावर धंगेकरांच्या आरोपांमुळे शिक्कामोर्तब होत आहे.
Harshwardhan Sapkal on Thackeray Bandhu Alliance स्थानिक पातळीवर युती करण्याचे अधिकार
आमच्या पक्षाचे युती करण्याचे अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची चर्चा ही स्थानिक आणि ब्लॉक पातळीवर होईल.
Harshwardhan Sapkal on Anandacha Shidha Yojana:...म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना बंद केली
लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. आनंदाचा शिधा बंद करण्याचा निर्णय त्याचाच एक भाग आहे. आनंदाचा शिधा बंद करण्यामागे एकनाथ शिंदेंचे नाव होऊ नये, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना बंद केली.
आणखी वाचा



















