एक्स्प्लोर

Abhijeet Dipke CJP : मी भारतातून जाताना जितकी माझी आई रडली नाही तितकी ती मी US वरून परत आलो म्हणून रडली; तिला अटक होण्याची भीती...; अभिजीत दिपकेंनी सांगितला पुढचा प्लॅन

Abhijeet Dipke CJP : कॉकरोच जनता पार्टीकडून पुण्यातही आंदोलन केले जात आहे. दरम्यान, अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे.

पुणे : देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची चर्चा सुरू आहे. नीट पेपर फुटीचा मुद्दा कॉकरोच जनता पार्टीने उचलू धरला आहे. याच मुद्द्यावरून सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी भारतात आल्यानंतर 6 जून रोजी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल. आता कॉकरोच जनता पार्टीकडून पुण्यातही आंदोलन केले जात आहे. यासंबंधी माहिती आज अभिजित दीपके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. या घोषणेमुळे आता केंद्र सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.(Cockroach Janta Party)मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा नाही दिला तर आम्ही देशव्यापी आंदोलन करणार आहोत, त्याची सुरुवात पुण्यातुन होणार नंतर लखनऊ, बेंगलोर वगैरे ठिकाणी आंदोलन करणार, राजीनामा नाही झाला तर २० जुनला दिल्लीला जंतरमंतरवर जाऊन पुन्हा आंदोलन करणार असल्याचं दीपके यांनी सांगितलं आहे, तर सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन करण्यास परवानगी मिळाली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर त्यांच्या परिवाराला वाटणारी भीती आणि त्यांच्या आईची काळजी याबाबतही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

अभिजित दिपके यांनी देशभरातील पालकांना आवाहन केले आहे. “तुमची मुलं सरकारला जाब विचारत असतील, राजकारणावर बोलत असतील तर तुम्हाला भीती वाटत असेल. माझ्या आईला भीती वाटते, माझी आई म्हणजे मी युएसला जेव्हा दोन वर्षा आधी गेलो तेवढी रडली नव्हती, जेवढी मी परत भारतात येताना रडली, आणि ती मला म्हणते तू परत येऊ नको, हे तुला अटक करतील किंवा दुसरं काही करतील, तुझ्यावर हल्ला होईल, पण मी तिला सांगितलं, यावं लागेल, कोणाला ना कोणाला बोलावं लागेल, मी जे आई वडील हे बघत आहेत, त्यांना सांगतोय तुमच्या लेकरांना बोलण्यापासून थांबवू नका. जोपर्यंत मी एकटा बोलत राहील, तोपर्यंत माझा एकट्याचा आवाज दाबायचा प्रयत्न करतील.पण जेव्हा लाखो करोडो स्टुडेंट सोबत बोलतील ना तेव्हा यांची हिम्मत होणार नाही, कोणाचा आवाज दाबायला आणि जेलमध्ये जर कोणाला टाकायचं तर मी जेलमध्ये जायला तयार आहे, तुमच्या लेकरांना जेलमध्ये जाऊ देणार नाही, मी त्याची जबाबदारी घेईल पण तुमच्या लेकरांना तुम्ही बोलण्यापासून थांबू नका, असं आवाहन त्यांनी पालकांना केलं आहे.

तर आता अमेरिकेतून आलेला आहात, परत जाणार आहे का नाही? यावर उत्तर देताना म्हणाले, आता इथच, बॅक फॉर गुड. उद्या किती सपोर्ट एक्सपेक्टेड आहे? यावरती उत्तर देताना म्हणाले की, उद्या हजारो मध्ये विद्यार्थी जमा होईल, मला तर वाटत जतंर मंतर पेक्षा मोठं आंदोलन होऊ शकतं,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Maharashtra Breaking LIVE: सोनम वांगचुक यांना 'जंतर मंतर'वरुन हटवलं, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
Abhijeet Dipke On Sonam Wangchuk: चर्चा नाहीच, पण सोनम वांगचुकना दिल्ली पोलिसांनी बळजबरीनं उचलताच अभिजित दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, 20 जुलैचा मोर्चासुद्धा निघणार असल्याचा केला एल्गार
चर्चा नाहीच, पण सोनम वांगचुकना दिल्ली पोलिसांनी बळजबरीनं उचलताच अभिजित दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, 20 जुलैचा मोर्चासुद्धा निघणार असल्याचा केला एल्गार
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Embed widget