Abhijeet Dipke : आम्ही ६ जूनला पाहिलं आंदोलन केलं तेव्हा खूप लोक आले होते. त्यानंतर आम्ही देशभर आंदोलन केलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अजून झाला नाही. ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांना 1 कोटी नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी आम्ही केली आहे. नागपूरमध्ये विद्यार्थने आत्महत्या केली त्याच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) गेले नाही. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे. नागपूरच्या विद्यार्थ्यांला अबुधाबीचे सेंटर मिळाले हे शॉकिंग आहे. त्यांच्याकडे पासपोर्ट नाही, तो कसं जाणार? याच उत्तर धर्मेंद्र प्रधान यांनी द्यावं. खासदार फोडायला पैसे आहेत. मात्रज्या मुलानी आत्महत्या केली त्यांना मदत करायला पैसे नाहीत. ही लाजिरवाणी गोष्टअसल्याचेसांगत सीजेपीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके (Abhijeet Dipke) यांनीकेलीआहे.  (Cockroach Janta Party) 

Continues below advertisement

Abhijeet Dipke : जात-धर्म काढले जात आहेत, त्याने पेपरफुटी थांबणार असल तर माझी जात धर्म काढा

मूळ मुद्दा बाजूला करून वेगळे वेगळे फोटो व्हायरल केले जात आहेत. पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिल आहे. कि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, हे आंदोलन फक्त नीट पुरते मर्यादित राहिलेले नाही. विविध मुद्यावर आम्ही पुढे हे आंदोलन देशभर करणारआहोत. असेही अभिजित दीपके (Abhijeet Dipke) म्हणाले. प्रादेशिक पक्ष फोडले जात आहेत. ते देश विरोधी काम करत आहेत, ते देशाशी गद्दारी करत आहेत. मात्र प्रादेशिक पक्ष टिकले पाहिजेत. देशात 12 विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. यावर सरकार बोलत नाही. सरकार राजीनामा घेत नाही. प्रधान यांचा राजीनामा घेतल तर सिस्टम व्यवस्थित चालेल. जात धर्म काढले जात आहेत. त्याने पेपर फुटी थांबणार असल तर माझी जात धर्म काढा, असेही अभिजित दीपके म्हणाले.

Continues below advertisement

Cockroach Janata Party Abhijeet Dipke: काय आहे 'कॉक्रोच जनता पार्टी'चा इतिहास?

काही दिवसांपूर्वी देशाचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) सूर्यकांत यांनी काही बेरोजगार तरुणांची तुलना 'कॉक्रोच' म्हणजेच झुरळांशी केली होती. याच विधानाचा आधार घेत सोशल मीडियावर उपरोधात्मक किंवा गमतीने 'कॉक्रोच जनता पार्टी' नावाचे हँडल तयार करण्यात आले होते. मात्र, अवघ्या चार दिवसांतच या हँडलचे फॉलोअर्स भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपेक्षाही अधिक झाल्याने या डिजिटल चळवळीने आता प्रत्यक्ष राजकीय आंदोलनाचे रूप घेतले आहे