Cockroach Janta Party Abhijeet Dipke: देशभरात सध्या कॉकरोच जनता पार्टीची (Cockroach Janta Party) सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या 7 दिवसांत कॉकरोच जनता पार्टीने इन्स्टाग्रामवर 18.7 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. देशभरात चळवळीतून उभी राहिलेली मोहिमचे राजकीय पक्षामध्ये रुपांतर होईल का?, असा सवाल कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांना एबीपी माझाशी बोलताना विचारण्यात आला. यावर नक्कीच होईल, पण मला आत्ता सांगण थोडं अवघड आहे, अशी प्रतिक्रिया अभिजीत दीपके यांनी दिली. त्यामुळे आगामी दिवसांत अभिजीत दीपके यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र अभिजीतने राजकारणात जाऊ नये, चळवळ आता थांबवावी, अशी प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांनी दिली आहे.

Continues below advertisement

अभिजीतचे फॉलोअर्स वाढले असले तरी आम्हाला चिंता आहे. अभिजीतने राजकारणात जाऊ नये, आता चळवळ थांबवावी, असं अभिजीतने वडील भगवान दीपके म्हणाले. तसेच अभिजीतच्या प्रसिद्धीच्या चिंतेने आई देखील दोन दिवस झोपली नाही, असंही भगवान दीपके यांनी सांगितले. प्रसिद्धीमुळं भीती वाटते, दुसरं काही नाही. उचलून नेतात, अटक करतात, आपल्याला याची काय सवय नाही. आपल्या मुलाला अटक करतील का असं वाटते, असं अभिजीतची आई अनिता दीपके म्हणाल्या. अभिजीत दीपकेनं एका मीडियावर बोलताना म्हटलं की भारतात गेलं की तुरुंगात टाकतील असं म्हटल्याचं भगवान दीपकेंनी म्हटलं. संजय राऊत, संजय सिंग यांना आत टाकलं होतं, कोर्टानं त्यांना निर्दोष सोडलं पण पेपर पाहून भीती वाटते. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असं भगवान दीपके यांनी एबीपी माझीशी बोलताना सांगितले. (Cockroach Janta Party Abhijeet Dipke)

कॉकरोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली- (Cockroach Janta Party)

मूळच्या छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) मराठमोळ्या तरुणाने अमेरिकेच्या बोस्टनमध्ये बसून 'कॉकरोच जनता पार्टी' (Cockroach Janta Party) नावाने एक वेबसाईट, इंस्टाग्राम हॅन्डल आणि एक्सचं खातं बनवलं. आणि बघता बघता संपूर्ण देशभर ही कॉकरोच जनता पार्टी अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरली आहे. तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात जर कोणी तरुणांचाच अपमान केला तर काय होतं याचा प्रत्यय एका चळवळीतून आला आहे.

Continues below advertisement

कोण आहेत अभिजीत दीपके? (Who Is Abhijeet Dipke)

30 वर्षीय अभिजीत दीपके मूळचा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील रहिवाशी आहे. अभिजित सध्या अमेरिकेतल्या बोस्टन येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. याआधी अभिजीत यांनी आम आदमी पक्षाचे सोशल मीडिया हँडल सांभाळले आहे. आता अभिजीत दीपके कॉकरोच जनता पार्टीचे 'संस्थापक आणि समन्वयक' आहेत. सरन्यायाधीश हे फक्त निमित्त होतं. अनेक वर्षं साचलेला राग कुठूनतरी बाहेर येणारच होता. नव्या पिढीला हिंदू-मुस्लिम, जात-पात हे सगळे भेद नको आहेत. आम्हाला चांगलं शिक्षण, रोजगार आणि नवनवीन तंत्रज्ञान हवं आहे, असं अभिजीत दीपके म्हणाले.

संबंधित बातमी:

Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीवर पहिली कारवाई; प्रचंड लोकप्रियतेनंतर सोशल मीडियावर नेमकं काय घडलं?

Cockroach Janta Party Manifesto: पक्ष बदलणाऱ्या आमदार-खासदारांवर 20 वर्षे बंदी, महिलांना 50 टक्के आरक्षण; कॉकरोच जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात काय?