मुंबई : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून भाजपच्यावतीने आज मुंबईतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीवेळी फडणवीसांनी जोरदार भाषण करत देशभक्तीपर गाणंही गायलं. भारताला आता कुणीही थांबवू शकत नाही. पण हेही खरंय की काही शक्ती भारताला थांबवायचा प्रयत्न करत आहेत, काही परकीय शक्तीही प्रयत्न करत आहेत की भारताची घौडदौड थांबली पाहिजे. कारण, त्यांना भीती वाटतेय की भारताची (india) घोडदौड अशीच सुरू राहिली, तर जगातील सर्वात महासत्ता असलेला देश भारत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी म्हटले. 

Continues below advertisement

मला आज खर म्हणजे दोन सागर दिसतात, एक हिंद महासागर समोर दिसतोय आणि दुसरीकडे तिरंगा महासागर पाहायला मिळतो. जोपर्यत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत तिरंगा आता खाली येणार नाही. भारत जगातील 4 थी आर्थिक महासत्ता बनला आहे, सध्या आयटी, AI मध्ये जगात सगळ्यांशी मुकाबला भारत देश करतो. सर्वाधिक युवा असलेला देश भारत बनला आहे. पण, काही परकीय शक्ती भारताला थांबविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना भीती आहे की भारत जगात महासत्ता होईल, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. 

तरुणाईला थांबवण्याची ताकद तुमच्यात नाही

भारताच्या अंतर्गत मामल्यामध्ये काही ना काही लुडबूड करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मी त्यांनाही सांगू इच्छितो की, ही तिरंगा हाती घेऊन बाहेर पडलेली तरुणाई आहे, यांना थांबवण्याची ताकद तुमच्यात नाही. भारताला थांबविण्याची ताकद तुमच्यात नाही, भारत हा पुढे जात राहणारच, आता 2 दशक बाकी आहेत 2047 ला विकसित भारत जगात आपल्याला पाहायला मिळेल, असेही फडणवीसांनी म्हटले. 

Continues below advertisement

भारत विरोधी शक्तीला भारत छोडो म्हणायची क्रांती

आपल्याला एकच दृष्टिकोन मंत्र घ्यावा लागेल, आपल्याला एकत्रित चालावं लागेल, तिरंगा घेऊन सोबत जावं लागेल. मरते दम तक साथ चलेंगे, नवभारतची संकल्पना मोदी यांनी मांडली. आता ही जबाबदारी तुमची आहे, ही जबाबदारी पार पाडू, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नागरिकांना 15 ऑगस्टच्या स्वातंत्र दिनाच्या खूप शुभेच्छा दिल्या. 9 ऑगस्ट 1942 ची क्रांती 'भारत छोडो'ची होती, आताची क्रांती 'करो या मरो'ची क्रांती आहे, विकसित भारतची आहे, आताची क्रांती भारत विरोधी शक्तीला भारत छोडो म्हणायची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

हेही वाचा

शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण