Chhatrapati Sambhajinagar News : कायदा फक्त सामान्यांसाठीचआहे की तो सत्ताधाऱ्यांसाठीही आहे? हा प्रश्न आतासाऱ्यांनापडलाआहे. कारण एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास हजार रुपयांचा दंड भरावालागेल असा नियम सरकारनेच केला. पण त्याच सरकारमधील नेते, विरोधी पक्षातील नेते आणि मंत्र्यांच्या गाड्यांवरच एचएसआरपी प्लेट (HSRP Number Plate) दिसत नसेल, तर कायबोलावं? शिवाय प्रश्न फक्त नंबर प्लेटचा नाही तर प्रश्न आहे कायद्याच्या विश्वासार्हतेचा आहे. त्यामुळेनियमआणिदंडकेवळ सामान्यांसाठीचआहेका? असाप्रश्नआतानागरिकांनापडलाआहे.
दरम्यान, हेसगळंबोलण्यामागीलकारणम्हणजे छत्रपती संभाजीनगरात मंत्री संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) यांच्या निवासस्थानी उभ्या असलेल्या वाहनांवर एचएसआरपी प्लेट दिसली नाही. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या वाहनावरही ती नव्हती. तर खासदार संदीपान भुमरे यांच्या वाहनावरही तोच प्रकार दिसून आला असल्याने कायदा फक्त सामान्यांसाठीचआहेका? असाप्रश्नपडलाआहे.
नेमकंप्रकरणकाय?
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरात मंत्री संजय शिरसाठ यांच्या निवासस्थानी उभ्या असलेल्या वाहनांवर एचएसआरपी प्लेट दिसली नाही. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वाहनावरही ती नव्हती. तर दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यासाठी वापरण्यात आलेल्या खासदार संदीपान भुमरे यांच्या वाहनावरही तोच प्रकार दिसून आला. चूक मान्य करणं वेगळं. पण कायदा काय सांगतो? मुदत संपली आहे. कारवाई सुरू झाली आहे. मग सामान्य नागरिकालाही अशीच माफी मिळणार का? की त्याच्याकडून आधी हजार रुपयांचा दंड वसूल होणार? कायद्याचा अर्थ दंड टाळण्यासाठी दिलेलं स्पष्टीकरण नसतो. तर सर्वांना समानपणे लागू होणारा नियम असतो. त्यामुळेयाराजकीयमंडळींवरदेखीलकारवाईहोईलका? असाप्रश्ननागरिकांना पडलाआहे.
Chhatrapati Sambhajinagar: सायरनचा आवाज आला की कायद्याचाही आवाज बंद होतो?
दरम्यान, चौकात उभा असलेला पोलीस सामान्य माणसाची गाडी क्षणात थांबवतो. एचएसआरपी नाही म्हणून हजार रुपयांचा दंडही ठोकतो. पण हेच पोलीस जेव्हा सायरन वाजवत, पोलिसांच्या बंदोबस्तात मंत्र्यांच्या आणि बड्या नेत्यांच्या गाड्या पुढे नेतात. तेव्हा त्याच गाड्यांवरील नियमभंग त्यांना दिसत नाही का? की सायरनचा आवाज आला की कायद्याचाही आवाज बंद होतो? असाप्रश्नसर्वसामान्यांनापडलाआहे. कायदा जर सर्वांसाठी समान असेल तर कारवाईही सर्वांवर समान झाली पाहिजे. अन्यथा कायद्यावरचा सामान्य माणसाचा विश्वास डळमळीत होतो.
HSRP नंबर प्लेटबद्दल नियम कायसांगतो? (HSRP Number Plate Rules)
- 1एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना बंधनकारक
-मुदत : 30 जून 2026
-1 जुलैपासून कारवाई
-दंड : ₹1,000
इतर महत्वाच्या बातम्या
