संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक महासंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली असून 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार अंबादास दानवे, ठाकरेसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिलीप घुगे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिलीप घुगे यांनी महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. तब्बल 18 वर्षे पदवीधरांचे प्रतिनिधित्व करताना सतीश चव्हाण यांनी पदवीधरांचे नेमके कोणते प्रश्न सोडवले, असा सवाल घुगे यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घुगे विरुद्ध सतीश चव्हाण असा सामना रंगणार आहे. सतीश चव्हाण यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक महासंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली असून 23 ऑक्टोबर 2026 रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
पदवीधरचा महायुतीचा उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पारड्यात !
दुसरीकडे महायुतीची पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठीची उमेदवारी माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सतीश चव्हाण यांच्या पारड्यात पडली आहे. सलग तीन टर्म निवडून आल्यानंतर आता चौथ्या वेळेस अजित पवार गटातील नेत्यांनी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी माजी आमदार सतीश चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवला आहे. पक्षाने सतीश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे पत्रही जाहीर केले. त्यानंतर पदवीधर मतदार संघाच्या पार्श्वभूमीवर पक्षातील नेत्यांची बैठकही झाली.या उमेदवारीमुळे मराठवाड्यातील पदवीधर मतदार संघाच्या राजकारणाला वेग आला आहे. या मतदारसंघातील लढत यामुळे रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या जागांसाठी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांनी याआधी तीन टर्म प्रतिनिधित्व केले होते. 2008,2014, 2020 मध्ये प्रतिनिधित्व केल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (A.P) पक्षाने पुन्हा एकदा सतीश चव्हाणांवर ही जबाबदारी सोपवली आहे. पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्याचे अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे.
Before You Go
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?























