Rohit Pawar and Chhagan Bhujbal: अजितदादांना अमोल कोल्हेंना संयुक्त राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष करायचं होतं; रोहित पवारांच्या दाव्याची भुजबळांनी उडविली खिल्ली, म्हणाले...
Rohit Pawar and Chhagan Bhujbal: अमेरिकेत यंत्रणा आहे. ब्लॅकबॉक्समधली जे गूढ आहे ते काढू शकते. राज्य व भारत सरकार यामध्ये पूर्णपणे काळजी घेत आहे. विमानाच्या रडारमध्ये त्रुटी

Rohit Pawar and Chhagan Bhujbal: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर अजित पवार यांना संघटनेत अनेक बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं. अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळेच अमोल कोल्हे (Amol Kolhe) अनेक बैठकांमध्ये होते, या रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ उडाली होती. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वक्तव्यावर आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे. त्यांनी एकप्रकारे रोहित पवार यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. ते गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (NCP Merger news)
रोहित पवार म्हणतात त्यांच्यासोबत अजितदादांनी काही ठरवलं होतं. पण अजितदादांनी आम्हाला काही सांगितले नाही. असं काही ठरलेलं हे आम्हाला माहिती नाही. आमच्या पुढे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काम हातात घेतले आहे, त्यांना पूर्णपणे सहकार्य करणे, हे आमचे कर्तव्य आहे. आमच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई आहेत, त्यांच्याशी बोलावे. नवीन उपमुख्यमंत्री आहेत त्या ठरवतील. विलीनीकरण झालं सुद्धा नाही, त्या अगोदर कोणत्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार ही ठरलं असेल. राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हेदेखील ठरले असेल. कोणी काही सांगितलं तर आपण त्याच्यावर काय बोलणार, अशी उपहासात्मक टिप्पणी छगन भुजबळ यांनी केली.
Rohit Pawar news: रोहित पवार पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत काय म्हणाले?
रोहित पवार यांनी बुधवारच्या पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर थेट भाष्य केले होते. मला आज विलिनीकरणावर अधिकचं बोलायचं नाही, असे म्हणत त्यांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होते असे म्हटले. अजितदादा आज नाहीत, त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य नाही. मात्र, दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात अनके बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं. अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळेच अमोल कोल्हे अनेक बैठकांमध्ये होते. त्यादृष्टीने चर्चा होत होत्या. पण आज दादा राहिले नाहीत, ज्यांच्यासोबत आम्हाला कंफर्ट होता. त्यांची भावनिक इच्छा होती, राजकीय इच्छा दुय्यम होती. दोन्ही पक्ष कुटुंब एकत्र यावेत असं त्यांना वाटत होते. डॉ. अमोल कोल्हे हे संयुक्तित राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले असते, अशी दादांचीच इच्छा होती. त्यामुळेच, ते प्रामुख्याने बैठकीत पुढाकार घेत होते. ज्यांच्या घरी यासंदर्भात 13 बैठका झाल्या, त्या जयंत पाटील यांच्या घरासमोरील सीसीटीव्हीत तुम्हाला दादा दिसून येतील, असे रोहित पवार यांनी सांगितले होते.
आणखी वाचा
सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी 35 आमदारांचा पाठिंबा, सह्या न करणारे 'ते' आमदार कोण?
























