Chhagan Bhujbal: नाशिक शहरातील (Nashik City) रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांमुळे (Potholes) नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यांनी नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचे सांगितले. याचवेळी त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांना जाहीर पाठिंबा देत, "त्यांना काम करू द्या, माझा फुल्ल सपोर्ट आहे," असे स्पष्टपणे सांगितले.

Continues below advertisement

भुजबळ यांनी नाशिकमधील रस्त्यांची दयनीय अवस्था, कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) कामांतील नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. छगन भुजबळ म्हणाले की, "सगळीकडे खड्ड्यांची बातमी आहे. कोतकर यांचा मृत्यू नुकताच झाला. कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत. रस्ता करताना नियम असा आहे, एका बाजूला रस्ता झाला तर दुसऱ्या बाजूचा रस्ता खड्डेविरहित पाहिजे. तातडीने रस्ते बुजविले पाहिजेत. कुंभमेळ्याचे आयुक्त आहेत, मनपा आयुक्तांनी लक्ष दिले पाहिजे. महापौर, आमदार यांचेही अधिकारी ऐकत नाहीत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष द्यावे. नगरसेवक, महापौर यांचे ऐकत नाहीत. शहर वाऱ्यावर सोडले आहे का? असा  सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

Chhagan Bhujbal: नाशिकचं नाव खराब होतंय 

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, "हा सर्व विषय मी मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार आहे. जे मृत्युमुखी पडले आहेत, त्यांचा मनपा आणि शासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनाही 10 लाख रुपयांची मदत दिली पाहिजे. एवढे खड्डे नाशिकमध्ये कधी नव्हते. नाशिकचे नाव खराब होत आहे. आपल्या नाशिकमध्ये हे काय सुरू आहे, वाईट वाटते. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. महापालिका आयुक्तांना जबाबदारी घ्यावीच लागेल. थोडी तरी माणुसकी दाखविली पाहिजे. कुटुंबाप्रती संवेदना दाखवली पाहिजे. असंतोषाची वाट कोणीही पाहू नये. यात सर्व आले, असे म्हणत त्यांनी यंत्रणेला सावध करणारा सूचक इशारा दिला.

Continues below advertisement

Chhagan Bhujbal on Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे यांना माझा फुल्ल सपोर्ट

दरम्यान, भुजबळ यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांचे कौतुक करत त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला. "बऱ्याच वर्षांनंतर एफडीएला अत्यंत चांगला अधिकारी मिळाला आहे. या आधी झगडे यांनी काम केले, पण मुंढे यांना काम करू द्या. काही लॉबी आहेत. त्या त्यांना काम करू देत नसतील तर मुंढे यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. माझा फुल्ल सपोर्ट तुकाराम मुंढे यांना आहे,"  असे स्पष्ट मत भुजबळ यांनी मांडले.

 

आणखी वाचा 

Radhakrishna Vikhe Patil on Manoj Jarange Patil: 'फडणवीसांनी घेतली तशी भूमिका कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही'; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर विखे पाटील सगळंच बोलले, म्हणाले...