Chhagan Bhujbal : महात्मा फुले (Mahatma Jyotirao Phule Statue) यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ओबीसी नेते आणि मंत्री मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पत्र पाठवलं आहे. तेलंगणात (Telangana) सामाजिक विचारांवर हल्ला झाला असून या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
महात्मा फुले यांच्या पुतळा विटंबना प्रकरण केंद्रीय मंत्री अमित शाहांकडे(Amit Shah) तातडीच्या कारवाईची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर हल्ला म्हणजे सामाजिक समतेवरच घाला आहे, असेही छगन भुजबळ म्हणालेत. त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Ambadas Danve:महात्मा फुले देशाच्या अस्मिता, कारवाई करायलाच हवी
दुसरीकडे या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. तेलंगणामध्ये जिथे कुठे हि घटना घडली असेल, अशा पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबनाची होणं हि घटना चुकीची आहे. महात्मा फुले देशाच्या अस्मिता आहेत. जे कोणते सरकार असेल त्या सरकारने चौकशी करायला हवी, भूषणवर कारवाई करायला हवी. पण कोशारऱ्यांना ज्या प्रकारे महात्मा फुलेंचा अपमान केला होता त्यावरही कारवाई व्हायला हवी. अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली आहे.
Beed : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील हज यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी पूर्ववत सुरू करा, आरोग्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
हज यात्रेसाठी जात असलेल्या भाविकांची स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तपासणी केली जात होती. मात्र यावर्षीपासून आरोग्य विभागाने ऑनलाइन नोंदणीसाठी ॲप सुरू केले असून या ॲपचा पासवर्ड फक्त बीड जिल्हा शल्य चिकित्सकांकडेच देण्यात आला आहे. त्यामुळे अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाने हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची वैद्यकीय तपासणी करण्यास असमर्थता दर्शविली आहे.अंबाजोगाई व परिसरातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात जाणे गैरसोयीचे असल्याने सर्व सुविधा असलेल्या अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयातच हज यात्रेकरूंची तपासणी दरवर्षीप्रमाणे करावी अशी मागणी केज मतदार संघाचे आमदार नमिता मुंदडा यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना पत्राद्वारे केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
