Chhagan Bhujbal and Girish Mahajan: नाशिक (Nashik) शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांचा (Potholes) प्रश्न आता राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. शहरातील खराब रस्त्यांमुळे आतापर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू (Death) झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रशासन आणि महापालिकेच्या (Municipal Corporation) कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावरून छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यात अबोला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता या चर्चेवर छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

Continues below advertisement

नाशिकमधील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांवर बोलताना छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी रस्त्यांच्या कामातील निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना मदत देण्याची मागणी केली होती. भुजबळ म्हणाले होते, "जेवढे लोक मृत्यूमुखी पडले आहेत, ते शासनाच्या महापालिका यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. एकाला जसा न्याय दिला तशीच रक्कम सर्वांना दिली पाहिजे. मंत्री गिरीश महाजनांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही." भुजबळांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर आता गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले होते.

गिरीश महाजन यांनी भुजबळ यांच्या विधानावर बोलताना म्हटले होते की, "जबाबदारी माझी आहे, ‘मी कुंभमेळा मंत्री आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे झाली होती का? नाशिककरांना त्रास होणार आहे हे मी सांगितले होते. डांबरी रस्ते टिकत नाहीत त्यामुळे व्हाइट टॉपिंग करत आहोत. चाळीस हजार कोटी खर्च करून चेहरा मोहरा बदलत आहे. एका रोडखाली सात प्रकारची युटिलिटी करत आहोत. सुविधा मिळणार आहे, कॅमेरा लावत आहोत. नवीन आणि मॉडर्न नाशिक आपण करत आहोत. येणाऱ्या सहा महिन्यात कामे पूर्ण होतील. नाशिककर म्हणतील आमच्या शहरासारखे शहर नाही," असे महाजन यांनी सांगितले.

Continues below advertisement

Chhagan Bhujbal and Girish Mahajan: गिरीश महाजनांशी अबोला? छगन भुजबळ म्हणाले...

दरम्यान, नाशिक खड्डे प्रकरणावरून छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यात अबोला असल्याच्या चर्चांनाही वेग आला होता. यावर 'हे सगळं मीडियाने क्रिएट केलेलं पिक्चर आहे,' असे छगन भुजबळ यांनी सांगितले. नाशिक येथे आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळ्यात झालेल्या प्रसंगाचा उल्लेख करताना भुजबळ म्हणाले, "किंबहुना वरती हार घालायला जाताना गिरीश महाजन यांनी मला हात देऊन वर घेतले." तसेच पुढे ते म्हणाले, "कोणी भाषण करत असतो त्यावेळी आपण त्यांचे ऐकत असतो किंवा आपल्याला पुढे काय बोलायचं याचा विचार करत असतो, त्यामुळे असं काहीही नाही," असे म्हणत गिरीश महाजन आणि आपल्यात कोणताही अबोला नसल्याचे स्पष्ट करत भुजबळांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal: नाशिक शहराला वाऱ्यावर सोडलंय का? खड्ड्यांमुळे 5 वा बळी गेल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक, म्हणाले, 'कुंभमेळा मंत्र्यांनी...'