Chhagan Bhujbal : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होते. त्यासाठी धुळ्यावरून शिर्डीला विमानाने यायचे होते. ज्यावेळीआम्ही विमानात सगळे बसलो आणि विमानाची दोन्ही इंजिन सुरू झाले, धावपट्टीवर जाऊन उड्डाण घेणार त्याचवेळी डॅशबोर्ड दोन्ही स्क्रीन बंद झाल्या. मध्येच बंद झाले असते तर लँडिंगला प्रॉब्लेम आला असता. त्यामुळे ताबडतोब उड्डाण रद्द केले. तुमच्या इंजिनियरला बोलून काय असेल ते करा तोपर्यंत तुम्ही थांबा. असंसांगून त्यानंतर आम्ही गाडीने येवल्याला पोहचलोअसाथरारकअनुभव राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितलाआहे. इंजिनमध्ये काही वेळा असे काही प्रॉब्लेम होतात. असेहीतेम्हणाले. नुकतंचआमदाररोहितपवारयांनीदिवंगतअजितपवारयांच्याविमानअपघातबाबतकशीशंकाउपस्थितकरतगंभीरआरोपकेलेत. त्यासंदर्भातबोलताना मंत्री छगन भुजबळ यांनीआपलाअनुभवसांगितलाय.
Chhagan Bhujbal on Ajit Pawar Plane Crash : क्रॅश गृहमंत्री अमित शाह यांना मीही सांगतो की...
दिवंगतअजितदादांच्याविमान अपघातावर कोणी कितीहीआणि काहीही शंका निर्माण केल्या तरी माझे म्हणणे इतकेच आहे की, शंका पुरावे असतील तर वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआयच्या चौकशीची मागणी केलीय. गृहमंत्री अमित शाह यांना मीही सांगतो की तुम्ही पण चौकशी करा. ज्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यांनी तपास यंत्रणांनाती माहिती दिली पाहिजे. त्याच्यामध्ये चौकशी करून किती तथ्यआहे ते समजेल. असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
Chhagan Bhujbal : दोन्ही मार्गाने चौकशी होईल, जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल
दरम्यान, ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही असं जय पवार यांच्याविधानावरबोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणालेकि, ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही हे खरे आहे. स्फोट झाले, आगीचा प्रादुर्भाव एवढा होता, त्यामुळे थोडसं ते खराब झालं असेल. प्रफुल पटेल यांचे काल मी थोडे ऐकले. अशा परिस्थितीत अमेरिकेत यंत्रणा आहेत. ब्लॅकबॉक्स मधली जे गूढ आहे ते काढू शकतो. सगळ्या बाजूने आपण प्रयत्न करू. राज्य व केंद्र सरकार यामध्ये पूर्णपणे काळजी घेत आहेत. कोणाच्या काही चुका आहे का? मुद्दामहून कोणी काही केलं का? हा एक भाग आहे. दुसरा भाग पायलेटने काही चूक केली का? विमानामध्ये रडारमध्ये काही चुका झाल्या का? दोन्ही मार्गाने चौकशी होईल. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
