एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal on Rajya Sabha Election 2026: 'इतरांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...

Chhagan Bhujbal on Rajya Sabha Election 2026: राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, ऐनवेळी राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाली होती.

Chhagan Bhujbal on Rajya Sabha Election 2026: सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आपली वर्णी लागेल अशी आशा बाळगून असलेले छगन भुजबळ पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी राज्यसभेच्या जागेसाठी प्रफुल पटेल (Praful Patel) यांचे निकटवर्तीय असलेल्या राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांची निवड केली होती. राजेंद्र जैन यांनी सोमवारी लगेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत विधिमंडळात जाऊन राज्यसभा निवडणुकीसाठीचा उमेदवार अर्ज भरला. यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हेदेखील उपस्थित होते. राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरुन बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी आपल्याला राज्यसभेची उमेदवारी आणि पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल अप्रत्यक्ष आणि सूचकपणे का होईना नाराजी व्यक्त केली. तुमच्यावर अन्याय झाला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर, 'अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल , कल नही तो परसो, असे आमचे धोरण आहे. 'मै कबड्डी का खिलाडी हू, शतरंज का खिलाडी नही हू', अशी सूचक टिप्पणी केली. (Maharashtra Politics news)

राष्ट्रवादी काँग्रेसने तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी का दिली नाही, असा प्रश्न छगन भुजबळ यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना भुजबळ यांनी म्हटले की, भाजपकडे माझा प्रस्ताव (समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद आणि स्वत:ला राज्यसभेची उमेदवारी) मांडल्यानंतर निर्णय घेण्यासाठी शेवटचा एक दिवसच उरला होता. त्यावर भाजपकडून असं उत्तर आलं की, ज्यावेळी राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा समीर भुजबळ यांचा विचार करु. त्यामुळे भाजपने माझा प्रस्ताव नाकारला, यामध्ये तथ्य नाही. मी नाराज नाही, काय नाराज होणार? इतरांना जो न्याय मिळाला, इतर लोक राज्यसभा, लोकसभेवर आहेत, इकडे त्यांची मुलबाळं मंत्री आहेत, मी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मलासुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे, ही माझी मागणी होती, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

छगन भुजबळ यांनी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरेन, अशी अट ठेवली होती. यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्रित मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचा निर्णय भाजपचे दिल्लीतील नेते घेतात, त्यांना विचारणा करावी लागेल, असे सांगितले होते. मात्र, तुर्तास भाजपने भुजबळांचा हा प्रस्ताव अंमलात आणण्यास असमर्थता दर्शविली होती.

आणखी वाचा

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aadesh Bandekar on Eknath Shinde: ...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
...नाहीतर मला मंदिरासमोर फासावर द्या; विधानसभेत एकनाथ शिंदेंचा आरोप, आता आदेश बांदेकरांचं थेट उत्तर
Devendra Fadnavis : राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, प्रोत्साहनपर अनुदानाची 2026-27चं कर्ज भरण्याची अट काढली, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्यातील 'त्या' शेतकऱ्यांचं 50 हजारांऐवजी 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
'ते मारतात, मला वाचवा..' नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या अमानुष मारहाणीच्या धक्क्यातून पीडित महिला डॉक्टर अजूनही सावरलेल्या नाहीत, झोपेतही भयकंप
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Video : सुप्रीम कोर्टात वकिलाचा अभूतपूर्व राडा; सरन्यायाधीशांना उद्देशून अपशब्द, फाईली सुद्धा भिरकावल्या

Embed widget