एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना 'सातपुडा' बंगला सुटता सुटेना, काही महिन्यांपासून वेटिंगवर असलेले छगन भुजबळ म्हणाले, आपण त्यांना...

Chhagan Bhujbal on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी साडेचार महिन्यांपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, अद्याप त्यांनी शासकीय निवासस्थान रिकामे केलेले नाही.

Chhagan Bhujbal on Dhananjay Munde : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी साडेचार महिन्यांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, अद्याप त्यांनी शासकीय निवासस्थान रिकामे केलेले नाही. 4 मार्च रोजी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, पुढील 15 दिवसांत बंगला रिकामा करणे अपेक्षित होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर संबंधित मंत्रालयाची जबाबदारी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडे देण्यात आली, आणि 23 मे रोजी सातपुडा बंगल्याबाबत शासकीय आदेशही जारी करण्यात आला. मात्र, अद्याप सरकारी निवास उपलब्ध न झाल्यामुळे छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. आता यावर छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

छगन भुजबळ म्हणाले की, मी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावीत आणि निवासस्थाने कुठे असावीत या संदर्भातली व्यवस्था पाहत असते. त्यांनी मला पंधरा दिवसांनी पत्र दिले की, तुमच्यासाठी अमुक-अमुक निवासस्थान देण्यात आलेले आहे. याचा अर्थ तुम्ही तिथे राहायला जावे. आता राहायला जावं असे म्हटल्यानंतर एखादं घर खाली असेल तरच आपण राहायला जाऊ शकतो. तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय बाहेर काढणार? त्यातही ते आमचे सहकारी आहे. मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा बोललेलो नाही. आता मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्यावर चर्चा करतील. ते काय निर्णय घेतील? याची मला काही कल्पना नाही, असे त्यांनी सांगितले.  

मी काय तक्रार करणार?

या संदर्भात आपण अजित पवार अथवा इतर कोणत्या नेत्यांशी चर्चा केली आहे का? याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, अजितदादांनी विचारलं पण मी म्हटलं की, घर खाली झालं की जाईन. आमचे ते पक्षातले सहकारी आहेत. मी काय तक्रार करणार? मी फार-फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन की दुसरं एखादं छोटं मोठं घर असेल तर ते द्या. मुख्यमंत्री काय निर्णय घेतील ते पाहू, असे त्यांनी म्हटले. तसेच, मी यावर जास्त चर्चा करणार नाही. सामान शिफ्ट करायचं असेल तर मुदत वाढवून घेतात, नसेल तर दंड, भाडं द्याव लागतं, असेही भुजबळ म्हणाले.

धनंजय मुंडेंना 42 लाखांचा दंड

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याने विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली. परिणामी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या घटनेला साडेचार महिने होऊन देखील धनंजय मुंडे यांनी शासकीय बंगला सोडला नसल्याने त्यांना आता दंड लावण्यात आला आहे. आणि त्याची रक्कम आता तब्बल 42 लाखांपर्यंत पोहचल्याची माहिती समोर येत आहे. 

आणखी वाचा 

Sanjay Raut on Narendra Modi & Amit Shah : दिल्लीत मोदी-शाहांनी राष्ट्रपतींची भेट घेताच संजय राऊतांनी मोठा बॉम्ब फोडला; म्हणाले, सप्टेंबर महिन्यात...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel and Sharad Pawar: प्रफुल पटेल अन् शरद पवारांची सिल्व्हर ओकवर गुप्तभेट? तटकरेंच्या आधीच येऊन बसले पण कोणाला सुगावाही लागला नाही
प्रफुल पटेल अन् शरद पवारांची सिल्व्हर ओकवर गुप्तभेट? तटकरेंच्या आधीच येऊन बसले पण कोणाला सुगावाही लागला नाही
Dhananjay Munde: 'मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला'; धनंजय मुंडेंनी परळीकरांसमोर मनातली खंत बोलून दाखवली
'मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला'; धनंजय मुंडेंनी परळीकरांसमोर मनातली खंत बोलून दाखवली
Manoj Jarange : देवेंद्र फडणवीस यांची भूमिका द्वेषाने भरलेली, मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलंय; मनोज जरांगे पाटील संतापले, पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारणार?
देवेंद्र फडणवीस यांची भूमिका द्वेषाने भरलेली, मराठ्यांचं वाटोळ करण्याचं काम त्यांनी केलंय; मनोज जरांगे पाटील संतापले, पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारणार?
Manoj Jarange : एका महिन्यात सातारा गॅझेटचा GR काढतो म्हणाले होते, आठ महिने उलटून गेले; मनोज जरागेंचा संताप, आंदोलनाची तारीख जाहीर करणार
एका महिन्यात सातारा गॅझेटचा GR काढतो म्हणाले होते, आठ महिने उलटून गेले; मनोज जरागेंचा संताप, आंदोलनाची तारीख जाहीर करणार

व्हिडीओ

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report
Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel and Sharad Pawar: प्रफुल पटेल अन् शरद पवारांची सिल्व्हर ओकवर गुप्तभेट? तटकरेंच्या आधीच येऊन बसले पण कोणाला सुगावाही लागला नाही
प्रफुल पटेल अन् शरद पवारांची सिल्व्हर ओकवर गुप्तभेट? तटकरेंच्या आधीच येऊन बसले पण कोणाला सुगावाही लागला नाही
Ashok Kharat Crime news: जेलमध्ये बसून अशोक खरातची कमाई सुरुच, कुंभमेळा रिंगरोडसाठी जमीन गेली, तीन कोटींचा सरकारी मोबदला मिळणार
जेलमध्ये बसून अशोक खरातची कमाई सुरुच, कुंभमेळा रिंगरोडसाठी जमीन गेली, तीन कोटींचा सरकारी मोबदला मिळणार
Dhananjay Munde: 'मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला'; धनंजय मुंडेंनी परळीकरांसमोर मनातली खंत बोलून दाखवली
'मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला'; धनंजय मुंडेंनी परळीकरांसमोर मनातली खंत बोलून दाखवली
Dhurandhar 2 OTT Release: प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज; प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका
प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज; प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका
NEET Exam Paper Leak: NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कात कोण-कोण होतं? सीबीआयने तपासाची चक्रं फिरवली; सीसीटीव्ही अन् फोन कॉल्सची होणार झाडाझडती!
NEET पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कात कोण-कोण होतं? सीबीआयने तपासाची चक्रं फिरवली; सीसीटीव्ही अन् फोन कॉल्सची होणार झाडाझडती!
Raja Shivaji Box Office Collection: 'राजा शिवाजी'चा दुसरा आठवडाही दमदार; बॉक्स ऑफिस गाजवलं, पण 100 कोटींपर्यंतची वाट अजूनही खडतर, आतापर्यंत किती कमाई?
'राजा शिवाजी'चा दुसरा आठवडाही दमदार; बॉक्स ऑफिस गाजवलं, पण 100 कोटींपर्यंतची वाट अजूनही खडतर, आतापर्यंत किती कमाई?
Pune Crime Firing Lawrence bishnoi gang: पिंपरी-चिंचवडमधील एजे फर्निचर मॉलवर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सचा गोळीबार, शुभम लोणकरची फेसबुक पोस्ट, व्यावसायिकाला फायनल वॉर्निंगच देऊन टाकली
पिंपरी-चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सचा गोळीबार, व्यावसायिकाला फायनल वॉर्निंगच देऊन टाकली
Maharashtra Live blog updates: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; माणगावजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा 
Maharashtra Live blog updates: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; माणगावजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा 
Embed widget