एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal on NCP Merger: विलिनीकरणाची घाई कशाला? नवीन कॅप्टन नेमलेत ते बघतील; छगन भुजबळांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य; म्हणाले, सुनेत्रा पवारांना...

Chhagan Bhujbal on NCP Merger: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतच्या चर्चांना वेग आला आहे.

Chhagan Bhujbal on NCP Merger: अजित पवार यांच्या निधनानंतर (Ajit Pawar Death) राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबतच्या (NCP Merger) चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील काही नेत्यांच्या मते, 12 फेब्रुवारी रोजी अजित पवार विलिनीकरणाबाबत अधिकृत घोषणा करणार होते. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, आता या विलीनीकरणाचे पुढे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विलिनीकरणासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाही. हा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा केली जाईल, असे म्हटले. आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केलंय.

Chhagan Bhujbal on NCP Merger: विलिनीकरणाची घाई कशाला?

छगन भुजबळ म्हणाले की, रोज विलिनीकरणाची काय चर्चा आहे? विलिनीकरण करायचे तर आजही करता येईल आणि एक महिन्याने देखील करता येईल त्यात घाई करण्याचे कारण काय? सुनेत्राताई आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करतोय. दोन्ही बाजूच्या लोकांकडून चर्चा होईल, मात्र घाई का करत आहात?  आधी ठरलं होतं हे म्हणण्यात अर्थ नाही. आता नवीन कॅप्टन आले आहेत, त्यांना ठरवू द्या. माझ्या समोर कधीही हा विषय झालेला नाही. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा ताई यांना बसविणे हा माझा अजेंडा आहे. हे 100 टक्के ठरलं आहे, असे त्यांनी सांगितले. 

Chhagan Bhujbal on NCP Merger: आता कॅप्टन नेमले आहेत ते बघतील

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही आमदारांनी दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत इच्छा व्यक्त केली. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, मोघम बोलण्यात अर्थ नाही. आता कॅप्टन नेमले आहेत ते बघतील. आमदारांची मिटिंग घेतील. हा म्हणतो, तो म्हणतो म्हणून घाई का करत आहात? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

Chhagan Bhujbal on Narhari Zirwal:  खरं काय, खोटं काय ते समोर येईल

राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पैसे घेताना रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. लाच प्रकरणाशी माझा संबंध आला तर मी राजीनामा देईन, असे वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलंय. याबात विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, बरोबरच आहे. पोलीस चौकशी करतील. खरं काय, खोटं काय ते समोर येईल. त्यांनी स्वतःच सांगितले की, माझं नाव आलं तर राजीनामा देईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. 

आणखी वाचा 

Narhari Zirwal: नरहरी झिरवळ नॉट रिचेबल असल्याच्या चर्चांना उधाण, आदिवासी संमेलनाला गेलेच नाहीत, लाचखोरी प्रकरणामुळे प्रचंड कोंडी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget