Chhagan Bhujbal :  नाशिकचे रस्ते आज टकाटक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महिन्यातून एकदा नाशिकला यायला पाहिजे, असा टोला मंत्री छगन भुजबळ  (Chhagan Bhujbal) यांनी लगावला. यावेळी मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. आमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री मोटारीने नाशिकपर्यंत आले त्यांचे खूप खूप आभार असेही भुजबळ यावेळी म्हणाले. जागोजागी पोलीस पण थांबवले आहेत. अजिबात ट्रॅफिक देखील जाम होऊ देत नाहीत असे भुजबळ म्हणाले. इगतपुरीपासून नाशिकला येईपर्यंत हाडे खिळखिळा होतात असेही भुजबळ म्हणाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी भुजबळ बोलत होते.

Continues below advertisement

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यासाठी खूप कष्ट केले

नाशिकसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे. ही इमारत इतर जिल्ह्यात जाणार होती मात्र आम्ही मीटिंग मध्ये नाशिक निवडले. स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांनी कोणतीही अडचण आणली नाही त्याचे आभार. प्रत्येक वेळी पुणे येथे जाणे शक्य नव्हते, म्हणून नाशिकला हे उपकेंद्र खूप आवश्यक होते असे भुजबळ म्हणाले. कोणाचे नाव घुसण्याचे प्रयत्न नको, ज्याचं नाव घेत आहे तेही खूप मोठी माणसं आहेत असेही भुजबळ म्हणाले.मी मुख्यमंत्री महोदय यांची परवानगी घेऊन बोलायला उभा राहिलो आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यासाठी खूप कष्ट होते असेही भुजबळ म्हणाले. मुख्यमंत्री समोर असताना मंत्री छगन भुजबळ यांनी टोला लगावला. रनाशिकचे स्ते आज टकाटक आहेत, महिन्यातून तुम्ही एकदा यायला पाहिजे असेही ते 

नाशिकसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आणि आनंदाचा

नाशिकसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे. ही इमारत इतर जिल्ह्यात जाणार होती मात्र आम्ही मीटिंग मध्ये नाशिक निवडले. स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांनी कोणतीही अडचण आणली नाही त्यांचे आभार मानले. प्रत्येक वेळी पुणे येथे जाणे शक्य नव्हते म्हणून नाशिकला हे उपकेंद्र खूप आवश्यक होते असे भुजबळ म्हणाले.  

Continues below advertisement

नाशिकच्या शैक्षणिक विकासात महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उप-परिसर प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.