Chhagan Bhujbal Helicopter Pune:पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान मोठी चूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री (Chhagan Bhujbal) हे महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी येथे येत होते. मात्र, नियोजित हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याऐवजी पायलटने ते थेट कार पार्किंगच्या जागेत उतरवल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Continues below advertisement

कार्यक्रमासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. तरीही, खानवडी गावात पोहोचलेल्या हेलिकॉप्टरच्या पायलटला कार पार्किंगमधील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा भास झाला आणि त्याने तिथेच लँडिंग केले. या अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली.

Chhagan Bhujbal Helicopter Pune:  सुदैवाने जीवितहानी नाही

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पार्किंगमध्ये काही वाहने उभी असली तरी कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची नोंद नाही. पोलिसांनी तातडीने पायलटला योग्य माहिती दिल्यानंतर हेलिकॉप्टर तिथून हलवण्यात आले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. योग्य नियोजन असतानाही चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवणे अत्यंत धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः लोकवस्तीच्या जवळ अशा प्रकारची चूक मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकली असती, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.

Continues below advertisement

Chhagan Bhujbal Helicopter Pune:  प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता

दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे. हेलिपॅड स्पष्ट दिसत होते का, पायलटकडून नेमकी चूक कशी झाली किंवा काही तांत्रिक अडचण होती का, याचा तपास केला जाणार आहे. या घटनेनंतरही मंत्री छगन भुजबळ सुरक्षित असून त्यांनी आपला पुढील कार्यक्रम नियोजनानुसार पूर्ण केला. मात्र, या प्रकारामुळे सुरक्षा आणि समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sharad Pawar Varkari Community Controversy: मौलाना शरद पवारांना वारकरी संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय, तुम्ही जाळीदार टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडता तेव्हा...; तुषार भोसलेंची घणाघाती टीका

Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण