रायगडमधील नेत्यांसह, कार्यकर्त्यांना विनंती, पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर नेऊ नका; CM फडवीसांनंतर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
Chandrashekhar Bawankule: रस्त्यावर वाद न होता आपापल्या नेतृत्वासमोर वाद सोडवले पाहिजे. असे आवाहन करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रायगडमधील पालकमंत्री पदाच्या वादावर भाष्य केलं आहे.

Chandrashekhar Bawankule नागपूर : महायुतीमध्ये (Mahayuti) सर्व अलबेल राहील याची जबाबदारी भाजपची जास्त आहे. यासाठी मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढाकार घेत आहोत, की महायुतीत कुठेही ठिणगी पडू नये. पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटेल,अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केली असून तो गुंता ते सोडवतील. रायगडमधील तिन्ही पक्षातील नेत्यांना,कार्यकर्त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून मी विनंती करतो की वाद चव्हाट्यावर नेऊ नये. त्यांनी आपापल्या नेत्यांसोबत बसून वाद सोडवावे, जाहीर वक्तव्य करणे योग्य नाही. रस्त्यावर वाद न होता आपापल्या नेतृत्वासमोर वाद सोडवले पाहिजे. असे आवाहन करत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पालकमंत्री पदाच्या वादावर भाष्य केलं आहे. ते नागपूर येथे बोलत होते. यावेळी त्यांनी इतर अनेक मुद्यांवरही भाष्य केलं आहे.
उद्याही निवडणुक आल्या तरी भाजप अन् महायुती तयार- चंद्रशेखर बावनकुळे
दरम्यान, स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तयारी संदर्भात पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही 80 जिल्हाध्यक्ष नेमले आहे. 1232 तालुकाध्यक्ष नेमले आहे. 1 लक्ष बूथ समित्या नेमल्या आहे. लवकरच प्रदेशाध्यक्ष संदर्भातला निर्णय होईल. उद्याही निवडणुक आल्यातरी भाजप आणि महायुती तयार आहे. ऑक्टोबर पर्यंत निवडणुका घ्यावा लागणार आहे. राज्य सरकार निवडणूक आयोगाला त्यासाठीचे सर्व संसाधन देत आहे. निवडणुका लवकर झाल्या पाहिजे, कारण खालच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. 13000 पदांसाठीची ही निवडणूक असणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात 13000 नवीन नेतृत्व तयार होईल. असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
महाराष्ट्रातील सर्व सेवा ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
महसुली प्रशासन आम्ही लोकाभिमुख केलं आहे. येत्या काळात फिरते सेतू पथक तयार करणार आहोत. गावागावात जाऊन विविध दाखले प्रमाणपत्रे लोकांना देऊ. घरपोच लोकांना सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे संपत्तीचे वाद थांबतील, कोर्ट केसेस थांबतील, पांदण रस्त्यासंदर्भात आम्ही निर्णय घेतला आहे. पुढील दीडशे दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व सेवा ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहे. लोकांना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही, असं आमचे प्रयत्न आहे. महसूल खात्यात आत्ता तर काम सुरू झालं आहे. आणखी निर्णय होणार आहे. विभाग आधुनिक आणि लोकाभिमुख करण्याकरिता आम्ही प्रयत्न करत आहोत. कालबाह्य कायद्यांमध्ये आम्ही सुधारणा करणार आहोत. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























