Chandrashekhar Bawankule on Nashik Potholes: नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या (Potholes) प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण (Politics) तापले आहे. 'दत्तक नाशिकचे पालक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा, ही सर्वसामान्य नाशिककरांच्या मनातील भावना आहे,' अशा आशयाचे होर्डिंग राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (NCP Youth Congress) शहरात लावेलआहे. मित्रपक्षाकडूनलावण्यातआलेल्या होर्डिंगमुळं आतानाशिकच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असताना भाजपचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीयाप्रकरणावरभाष्यकरतप्रतिक्रियादिलीआहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटल्याप्रमाणे नाशिकच्याखड्डयांचाप्रश्न सहा महिन्यात निकालीलागून काम पूर्ण होईल. असाविश्वास चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनीव्यक्तकेलाआहे.
गिरीश महाजन यांनी म्हटल्याप्रमाणे नाशिकच्याखड्डयांचाप्रश्न सहा महिन्यात निकालीलागून काम पूर्ण होईल. त्यांनी हे जबाबदारीने सांगितलं आहे. त्यांना मंत्री म्हणून जबाबदारी आहे. त्यांना कुंभ मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री आणि सर्वांचं लक्ष कुंभमेळ्याकडे आहे. पण कुठलीही एका व्यक्तीची जबाबदारी नसते, ही सामूहिक जबाबदारी असते. सरकारमध्ये सामूहिक जबाबदारी असते. याची जबाबदारी, त्याची जबाबदारी पेक्षा सामूहिक जबाबदारीने काम केलं पाहिजे ती आम्ही करू. असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule: रायगड नाशिक पालकमंत्री पदाबाबत सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांना
रायगडचा पालकमंत्री कुणाला करायचं हा सर्वस्वी अधिकार महायुतीतील तिन्ही नेत्यांनाआहे. ते एकत्र बसून याबाबत लवकर निर्णयघेतील. रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला वाटतं. तर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठीप्रत्येक पक्षाने मागणी करणं योग्य आहे. पण मी आधीच सांगितलं सर्वस्वी अधिकार हे मुख्यमंत्र्यांचे आहेत. याबात मुख्यमंत्री योग्य निर्णय करतील. सर्वच पक्षांना सोबत घेऊन समन्वय करून हा निर्णय होत असतो असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Chandrashekhar Bawankule: ओबीसी आरक्षण संदर्भात सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आहे
ओबीसी आरक्षण संदर्भात सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आहे. जे 65 वर्षाच्या काँग्रेसच्या काळात झाले नाहीत तेवढे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. अजून काही मागण्या असतील तर आम्ही नक्की पूर्ण करू असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ओबीसींना आणखीन काही ॲडिशनल सवलती पाहिजे असतील, त्यांच्या काही मागण्या आहेत, त्या सुद्धा पूर्ण करण्याचा सरकार विचार करेल. असेहीतेम्हणाले.
Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती जपून आपण राजकारण केलं पाहिजे
पंकजा मुंडे नेमक्या कुठल्या संदर्भाने बोलल्याहे मला माहिती नाही. मला वाटतं त्या असा कधीच विचार करत नाहीत. तर धनंजय मुंडे आणि पंकजाताई कुठल्या संदर्भाने बोलल्याहेदेखील मला माहिती नाही, त्यामुळे मी टिपणी करणे योग्य होणार नाही. महाराष्ट्राचे संस्कार आणि संस्कृती जपून आपण राजकारण केलं पाहिजे. पक्ष, विरोधी पक्ष यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचे विकासाचे राजकारण केलं पाहिजे. असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
