एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule : मनोज जरांगेंचं आंदोलन सुरु असताना शरद पवार गप्प का?; भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल, म्हणाले....

Chandrashekhar Bawankule : शरद पवार यांनी त्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे, एवढं मोठं आंदोलन सुरू असताना शरद पवार गप्प का आहे? असा सवाल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : देशात विविध आंदोलने होत असताना, ईव्हीएस दहा टक्के आरक्षण मिळाले, आज नोकरी, शिक्षणमध्ये त्याचा देशभर फायदा मिळतो आहे. फडणवीस सरकारने ईव्हीएस आरक्षण आणि सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाला सर्वाधिक लाभ मिळवून दिला आहे. मात्र ओबीसीचे (OBC) 1 टक्के आरक्षण ही जाऊ द्यायचे नाही, ही भाजपची भूमिका आहे. मराठा समाजाला ही न्याय देण्याची भाजपची भूमिका आहे. मात्र काँग्रेसची भूमिका काय, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या या संदर्भात काँग्रेसची भूमिका काय? नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेस नेत्यांनी त्याबद्दल भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी केली आहे.

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे, एवढं मोठं आंदोलन सुरू असताना शरद पवार गप्प का आहे? आम्ही आमची भूमिका मांडली आहे की, मराठ्यांना न्याय देताना ओबीसीवर अन्याय करू नका किंवा मराठ्यांवर ही अन्याय होऊ देऊ नका. काँग्रेस आणि मविआ ने आपली भूमिका स्पष्ट करावी. असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

ओबीसीचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणे योग्य ठरणार नाही

काँग्रेस नेहमीच ओबीसींच्या विरोधात राहिली आहे. त्यांनी कधीच ओबीसींना न्याय दिलेले नाही. आज जर काँग्रेस खुला पाठिंबा जरांगेच्या आंदोलनाला देत असेल तर त्या आंदोलनाची भूमिका काय हे ही त्यांनी लक्षात घ्यावं? आधीच ओबीसीच्या 353 जातींना असलेले आरक्षण कमी आहे, अशात ओबीसीचे आरक्षण काढून मराठा समाजाला देणे योग्य ठरणार नाही, ते अन्यायकारक होईल. अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी मांडली आहे.

आमच्या सरकारची भूमिका राहिली आहे की, कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देऊ नये. ओबीसींचे आरक्षण मराठ्यांना देणे किंवा मराठ्यांचा आरक्षण ओबीसींना देणे योग्य ठरणार नाही. भाजप आणि आमचे सरकार सर्व समाजासोबत एकसारखेपणाने उभी आहे. काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जरांगेच्या आंदोलनाला समर्थन देतांना त्यांची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सरसकट या शब्दाला आमचा विरोध; सरसकट होऊ शकत नाही- चंद्रशेखर बावनकुळे

या संदर्भात जे सर्वेक्षण झाले. त्यामध्ये जेवढ्या ओबीसींकडे पिढ्यां पिढ्या आवश्यक डॉक्युमेंट्स आहे, मात्र त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नव्हते, त्यांना ओबीसीमध्ये घेण्यात आलं. अजूनही सर्वेक्षण सुरू आहे. ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण सरसकट हा जो शब्द आहे, या शब्दाला आमचा विरोध आहे. सरसकट होऊ शकत नाही. संपूर्ण 353 जातीमध्ये आधीच आरक्षण कमी आहे. त्यामुळे असं सरसकट न मागता ज्यांच्याकडे आवश्यक दस्तावेज आहे, त्यांना ओबीसीचे आरक्षण दिले जाईल. त्याला कोणीही नाही म्हणत नाही. सर्वेक्षण सुरूच आहे. असेही ते म्हणाले.

टीका करण्यापेक्षा राजकीय भूमिका घ्या- चंद्रशेखर बावनकुळे

विरोधकांचे न बोलणे म्हणजे काय? न बोलण्याचे अर्थ महाराष्ट्र समजतो. इतर सर्व मुद्द्यांवर तर तुम्ही बोलता मग ही चुप्पी कशासाठी आहे? मनोज जरांगेच्या आंदोलनाबद्दल तुम्ही बोलले पाहिजे. तुमची भूमिका राज्याला कळली पाहिजे. ओबीसींना, मराठ्यांना तुमची भूमिका कळली पाहिजे. शरद पवार आणि काँग्रेसची भूमिका काय हे कळलं पाहिजे. टीका करण्यापेक्षा राजकीय भूमिका घ्या, मात्र ते भूमिका घेत नाही आहे. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या परवानगी वाढवण्याची मागणी संदर्भात बोलायचं झालं तर हि उच्च न्यायालय आणि आंदोलकांमधील बाब आहे. त्यामध्ये मी बोलणार नाही. आंदोलकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. उच्च न्यायालयाचे अधिकार उच्च न्यायालयाला आहे. त्यामध्ये आम्ही बोलणे योग्य नाही. त्याबद्दल उच्च न्यायालय निर्णय घेईल. असेही बावनकुळे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, 

2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.

3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

संबंधित बातमी:

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget