Chandrashekhar Bawankule : गेल्या काही वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची (Caste Census) मागणी सातत्याने होत होती. आता या मागणीला केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कॅबिनेट मीटिंग ऑन पॉलिटिकल अफेअर्सच्या बैठकीत आगामी जनगणनेमध्ये जातींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला यामधून मोदी सरकारने प्रत्युत्तर दिले आहे. आता भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून विरोधकांना डिवचले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवर पोस्ट शेअर म्हटले आहे की, जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे आदरणीय शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आता गप्प का बसलेत आहेत? इतके दिवस जातीनिहाय जनगणना करा म्हणून घसा कोरडा करणारे नेते आता केंद्रातील मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल अभिनंदन करण्याचं औदार्य दाखवणार की नाक मुरडत घाणेरडं राजकारण करणार? हा सामान्य माणसाच्या मनातील सवाल आहे. केवळ आपल्या स्वार्थी राजकारणासाठी या नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी जातीचे संकुचित राजकारण केले. पण या जातीतील नागरिकांना प्रगतीच्या, विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एवढ्या वर्षात या राजकीय पक्षांनी काहीच केले नाही. 

किमान अभिनंदन करण्याचं सौजन्य दाखवावं

आता आदरणीय मोदीजी यांच्या सरकारने या जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून या देशातील सर्वच जाती प्रवाहांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संकल्प केला असताना त्यांचे अभिनंदन करण्याऐवजी श्रेय लाटण्याचे काम करीत आहेत. यातून या विरोधी पक्षांची संकुचित मानसिकता देशाला पुन्हा एकदा दिसून आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी जातीनिहाय जनगणनेसारखा क्रांतिकारी निर्णय घेतला. तेव्हा किमान अभिनंदन करण्याचं सौजन्य या नेत्यांनी दाखवावं ही अपेक्षा आहे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pahalgam Terror Attack: अमेरिकेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल; म्हणाले, आम्ही भारतासोबत, तुम्ही पहलगाम हल्ल्याचा निषेध करा!

Pahalgam Terror Attack: भारताचे आणखी एक मोठे पाऊल, पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय एअरस्पेस बंद; पाकिस्तानचा तो निर्णय त्यांच्यावरच उलटवला, होणार कोट्यवधींचं नुकसान, कारण काय?