Chandrapur Vidhan Parishad Election 2026: आगामी विधान परिषदेच्या चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे (Chandrapur Vidhan Parishad Election 2026) पूर्व विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर 'घोडेबाजार' सुरू झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे (Congress) जवळपास 40 नगरसेवक अचानक पर्यटनासाठी (Tourism) रवाना झाले असून, त्यांना भाजपकडून सहलीवर पाठवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल 80 नगरसेवक फोडण्याचे 'टार्गेट' (Target) सत्ताधाऱ्यांनी ठेवल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून समोर येत आहे.

Chandrapur Vidhan Parishad Election 2026: 5 लाखांचे टोकन अन् 'लक्ष्मीदर्शन'

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पर्यटनासाठी गेलेल्या 40 नगरसेवकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे 'टोकन' (Token Amount) देण्यात आले असून, हा आकडा तब्बल 15 लाख रुपयांपर्यंत (लक्ष्मीदर्शन) जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या पर्यटन वारीत सिंदेवाही नगरपंचायतीचे 4, सावली नगरपंचायतीचे 5, नागभीड नगरपरिषदेचे 5 नगरसेवकांसह कोरपना, कुरखेडा आणि कोरची यासह इतरही काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे.

Chandrapur Vidhan Parishad Election 2026: फडणवीसांच्या निकटवर्तीयावर खास जबाबदारी? 

मागच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही भाजपचे उमेदवार डॉ. रामदास आंबटकर हे अगदी काठावरच्या बहुमताने विजयी झाले होते. यावेळी महायुतीकडे बहुमत असले तरी ते विजयाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका भाजप आमदारावर (BJP MLA) या संपूर्ण मोर्चेबांधणीची जबाबदारी देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.

Chandrapur Vidhan Parishad Election 2026: मतदारसंघातील पक्षीय बलाबल

या मतदारसंघात महापालिकांचे नगरसेवक, नगरपालिका सदस्य आणि नगरपंचायत सदस्यांचा समावेश आहे, कारण तिन्ही जिल्ह्यांत सध्या जिल्हा परिषदेची निर्वाचित बॉडी अस्तित्वात नाही. एकूण मतदार संख्या (Total Voters) ९७७ आहे.

महायुती (Mahayuti)

एकूण 445भाजप - 341,शिवसेना (शिंदे गट) - 39, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) - 63, रिपाइं (आठवले) - 2.

महाविकास आघाडी (MVA)

एकूण 351 काँग्रेस - 293, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) - 33, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) - 25.

अपक्ष आणि इतर: 91.

Chandrashekhar Bawankule: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया 

याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले, याच्याशी आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही. काँग्रेसचे नगरसेवक, नगराध्यक्ष कुठे गेले, यासंदर्भात त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीच विचार करायचा आहे. त्यावर मी काही टिप्पणी करणे योग्य नाही. राहिला भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा प्रश्न, तर महायुती विधान परिषदेच्या सर्व 17 जागा जिंकेल.

Chandrashekhar Bawankule: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती

नागपूरमध्ये काँग्रेसला मी आवाहन केले आहे की, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मदत करा. नागपूरमध्ये जवळपास 800 पैकी 600 मते भारतीय जनता पक्षाकडे आहेत. ही निवडणूक असल्यामुळे संख्याबळ महत्त्वाचे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंधन वाचवा, पेट्रोल-डिझेल वाचवा’ असे आवाहन केले आहे. त्यामुळे या निवडणुका संख्याबळावर होत असतात. जर संख्याबळ जुळत नसेल, तर निवडणुका न होता त्या बिनविरोध व्हाव्यात, अशी विनंती मी सर्व पक्षांना केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही मी यासंदर्भात विनंती केली आहे. निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचारासाठी डिझेल-पेट्रोल लागते. अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक ठिकाणी आणि गावांमध्ये फिरावे लागते. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाला अनुसरून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्व पक्षांना विनंती आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आणखी वाचा 

Vidhan Parishad Election 2026:  निवडणूक कार्यक्रम जाहीर

अधिसूचना जारी : 25 मे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 1 जून

अर्जाची छाननी : 2 जून

अर्ज माघारीची शेवटची तारीख : 4 जून

मतदान : 18 जून - स. 8 ते दु. 4.

मतमोजणी : 22 जून

Vidhan Parishad Election 2026:  १७ जागांवर आधी कोण होते आमदार?

  1. सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
  2. अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
  3. ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
  4. जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
  5. सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
  6. नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
  7. यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
  8. पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
  9. भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
  10. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
  11. नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
  12. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
  13. अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
  14. धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)
  15. परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
  16. छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
  17. नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)

आणखी वाचा 

Sanjay Shirsat on Eknath Shinde: विधानपरिषदेच्या जागावाटपाचा तिढा, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, संजय शिरसाटांनी सांगितलं शिंदेंच्या दौऱ्यामागचं नेमकं कारण; म्हणाले...