Chandrapur Shiv Sena UBT : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत (BJP) जाण्यास उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) अद्याप हिरवा कंदील दिलानसल्याचीमाहितीसमोरआलीआहे. चंद्रपूरमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे (Chandrapur Shiv Sena UBT) नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दोन आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याशीयासंदर्भात चर्चा केली होती. यावेळी भाजपसोबत गेल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पदाचा प्रस्ताव असल्याचं स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यासोबतच काँग्रेसमध्ये (Chandrapur Congress) दोन गट पडले असल्यामुळे काँग्रेसपेक्षा भाजपचा प्रस्ताव अधिक योग्य राहील, असेही स्थानिक राजकारणाचे गणित असल्याचे उद्धव ठाकरेंसमोर नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मांडलं होतं. (Chandrapur)
मात्र, यावर स्थानिक पातळीवर कुठलाही निर्णय न घेता पक्ष पातळीवर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याची माहिती आहे. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. काँग्रेस चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापन करत असून आपल्या पक्षाने पाठिंबा द्यावा, हे आपलं म्हणणं विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरें समोर मांडलं होतं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्याची माहिती सुद्धा काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आली. यासर्वघडामोडींवरअद्यापतरी ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत जाण्यास तयारनसून उद्धव ठाकरेंनीअजूनतरीयावरसहमतीदिलीनसल्याचीमाहितीआहे.
Chandrapur Mayor : चंद्रपूरबाबत तोडगा काढण्यासाठी सुनील केदार दिल्लीत अरविंद सावंतांच्याभेटीला
दरम्यान, यासर्वपार्श्वभूमीवर चंद्रपूरबाबत तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक सुनील केदार यांनीठाकरेंच्याशिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांची भेट घेतलीआहे. दिल्लीत अरविंद सावंत यांना भेटायला सुनील केदार दाखलझालेआहे. ठाकरेंनी भाजपसोबत युती नाही असे संकेत दिल्यानंतर आता ठाकरेंकडून काँग्रेसला समर्थन अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील याभेटीलामहत्वप्राप्तझालंआहे. दरम्यानयाबैठकीतील चर्चेतनेमकाकायतोडगानिघतोहेपाहणं महत्त्वाचेठरणारआहे.
चंद्रपूर : एकूण नगरसेवक 66 (Chandrapur Election 2026 Result)
सध्याचे संख्याबळ
भाजप – 23
काँग्रेस – 27
काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6
वंचित - 2
बसपा - 1
शिवसेना (शिंदे गट) – 1
अपक्ष – 2
एमआयएम – 1
