Chandrapur Municipal Corporation Elections 2026 : चंद्रपूर महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युतीसाठी सुरू असलेली बोलणी अखेर फिस्कटली आहे. परिणामी आता राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर उमेदवार देणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि आरपीआय (खोरिपा) यांच्यातील युतीची शक्यता देखील मावळली आहे. त्यामुळे काँग्रेस आता चंद्रपूर महानगरपालिकेत 66 पैकी 66 जागांवर निवडणूक लढणार हे चित्र निश्चित झालं आहे.
Chandrapur BJP : भाजप 66 पैकी 58 जागांवर निवडणूक लढणार
चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युतीसाठी सुरू असलेली बोलणी फिस्कटलीय. परिणामी आता राष्ट्रवादी काँग्रेस 55 जागांवर उमेदवार देणार आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील युती निश्चित झाल्याची माहिती आहे. भाजप चंद्रपूर महानगरपालिकेत 66 पैकी 58 जागांवर निवडणूक लढणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाला 8 जागा मिळाल्या आहे. मात्र भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर न करता उमेदवारांना झोन कार्यालयात निवडणूक अर्ज भरण्यासाठी बोलवणार आणि त्याच ठिकाणी एबीफॉर्म मंडळ अध्यक्ष नेऊन देणार असलायची माहिती आहे.
Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवारांची बालेकिल्ल्यात विजयाची घोडदौड कायम राहणार?
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निकालात भाजप आणि मित्रपक्षाला भरघोस यश मिळाल्याचे दिसून आलं. असे असताना चंद्रपूर मात्र त्याला अपवाद ठरला. चंद्रपुरात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या होमपिचवर काँग्रेसने मोठं यश संपादन केलं. चंद्रपुरात 11 पैकी 8 जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला. तर भाजपला आणि शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या 1-1 जागी समाधान मानावं लागलंय. तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला आहे.
दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बोलकी प्रतिक्रिया देत 'चंद्रपूर मे टायगर अभी जिंदा हैं' असं देखील म्हटलं होतं. परिणामी हीच किमया आता आगामी महानगरपालिका निवडणुकीत देखील कायम राहण्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला आहे. अशातच आता विजय वडेट्टीवारांची बालेकिल्ल्यात काँग्रेस सर्वच्या सर्व जागा म्हणजेच 66 पैकी 66 लढवणार असल्याचे चित्र आहे.
Chandrapur Municipal Corporation Election 2026: महापालिका निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026
मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026
आणखी वाचा
- Nagaradhyaksha winners list: महाराष्ट्रातील विजयी नगराध्यक्षांची यादी वाचा एका क्लिकवर
- Akola Election 2026: अकोला महापालिकेत 'भाजप-राष्ट्रवादी' च्या युतीची घोषणा; 80 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार; तर शिंदेसेनेचा स्वबळाचा नारा