Chandrapur Mayor Election 2026: गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिकेत त्रिशंकू अवस्थेमुळे निर्माण झालेल्या सत्तानाट्याचा मंगळवारी नाट्यमय शेवट झाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपला (BJP) पाठिंबा देत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला. आज सकाळीच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे यांची बैठक झाली होती. या बैठकीत खटके उडाल्यामुळे संदीप गिऱ्हे रागात बैठकीतून बाहेर पडले होते. त्यानंतर काहीवेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने (Thackeray Camp Shivsena) भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा केली. (Chandrapur Mahanagarpalika Election 2026)
भाजप आणि ठाकरे गटामध्ये चंद्रूपर महानगरपालिकेचे महापौरपद सव्वा-सव्वा वर्षांच्या प्रत्येकी दोन टर्ममध्ये वाटून घेण्याबाबत एकमत झाले. तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे उपमहापौर होतील. उपमहापौर पद हे अडीच वर्षांसाठी प्रशांत दानव यांच्याकडे असेल. तर स्थायी समिती ही पहिल्या आणि चौथ्या वर्षासाठी ठाकरे गटाला देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तास्थापनेवरुन वाटाघाटी सुरु होत्या. काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र येऊन भाजपला चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तेपासून दूर ठेवेल, अशी चर्चा होती. संजय राऊत यांनी आज सकाळीच उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपला चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता मिळून द्यायची नाही, अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा होताच सर्वांनाच धक्का बसला.
या सगळ्या वाटाघाटींबाबत माहिती देताना, किशोर जोरगेवार यांनी म्हटले की, शिवसेनेच्या मागणीमुळे सगळं काही थांबलं होतं. भाजपकडे 24 नगरसवेकांचे संख्याबळ असल्याने महापौरपद ठाकरे गटाला द्यायला आमचे नेते तयार नव्हते. पण चंद्रपूरच्या विकासासाठी ठाकरे गटासोबत महापौरपदाची वाटणी करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
Chandrapur news: ठाकरेंनी भाजपला पाठिंबा का दिला? संदीप गिऱ्हे काय म्हणाले?
आमच्या पक्षाला महापौरपद मिळावे, ही आमची भूमिका होती. याबाबत काँग्रेसशी चर्चा सुरु होती. मी आज सकाळीदेखील विजय वडेट्टीवारांच्या कार्यालयात गेलो होते, महापौरपदाबाबत विनंती केली. पण ते आम्हाला पाच वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते. त्यामुळे आणि विकासाला चालना देण्यासाठी आम्ही भाजपसोबत बोलणी केली. किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार आमच्या संपर्कात होते. त्यानुसार आम्ही फॉर्म्युला ठरवला की, पहिली सव्वा वर्षे भाजपचा महापौर, त्यानंतर शिवसेनेचा महापौर, उपमहापौर पाच वर्षे, स्थायी समिती पहिलं आणि चौथं वर्षे शिवसेनेकडे, असा फॉर्म्युला ठरला आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संदीप गिऱ्हे यांनी दिली.
Chandrapur Mahanagarpalika Election 2026: चंद्रपूर महानगरपालिकेतील संख्याबळ
एकूण जागा 66
काँग्रेस 27काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेली जनविकास सेना 3भाजप 23शिंदेंसेना 1उबाठा शिवसेना 6वंचित 2बसपा 1अपक्ष (काँग्रेस बंडखोर) 2एमआयएम 1
आणखी वाचा