Chandrapur Mayor 2026 Congress and Shivsena: गेल्या काही दिवसांपासून सत्तास्थापनेच्या नाट्यामुळे चर्चेत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणात मंगळवारी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत मंगळवारी भाजपचा महापौर विराजमान झाला. हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का ठरला. भाजपने राजकीय चमत्कार घडवत चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली आहे. अवघ्या एका मताच्या फरकाने भाजपच्या संगीता खांडेकर यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली. यानंतर आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरमध्ये भाजपसोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चंद्रपूरमधील ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षनेतृ्त्त्वाला कोणतीही माहिती न देता परस्पर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे ठाकरे गटाचे चंद्रपूरमधील जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे आणि शिवसेनेच्या 6 नगरसेवकांवक शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या संगीता खांडेकर यांना 32 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवाराला 31 मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक गैरहजर राहिले. यामुळे बहुमताचा आकडा 33 वर पोहोचला. एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्याने निकालावर निर्णायक परिणाम झाला. अवघ्या एका मताने मिळालेल्या विजयामुळे भाजपच्या गोटात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

Sanjay Raut and Uddhav Thackeray: सकाळी संजय राऊत म्हणाले, भाजपसोबत जाणार नाही अन् एका तासात चंद्रपूरमध्ये गेम फिरला

Continues below advertisement

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळीच पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी संजय राऊत यांनी चंद्रपूरमध्ये भाजपसोबत न जाण्याची भूमिका मांडली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की, एक वेळ विरोधी पक्षात बसावे लागले तरी चालेल पण भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल, अशा प्रकारची कुठलीही भूमिका घेता येणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

Chandrapur Sandeep Girhe: संदीप गिऱ्हेंनी भाजपसोबत जाण्याचं कारण काय सांगितलं?

आमच्या पक्षाला महापौरपद मिळावे, ही आमची भूमिका होती. याबाबत काँग्रेसशी चर्चा सुरु होती. मी आज सकाळीदेखील विजय वडेट्टीवारांच्या कार्यालयात गेलो होते, महापौरपदाबाबत विनंती केली. पण ते आम्हाला पाच वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते. त्यामुळे आणि विकासाला चालना देण्यासाठी आम्ही भाजपसोबत बोलणी केली. किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार आमच्या संपर्कात होते. त्यानुसार आम्ही फॉर्म्युला ठरवला की, पहिली सव्वा वर्षे भाजपचा महापौर, त्यानंतर शिवसेनेचा महापौर, उपमहापौर पाच वर्षे, स्थायी समिती पहिलं आणि चौथं वर्षे शिवसेनेकडे, असा फॉर्म्युला ठरला आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे नेते संदीप गिऱ्हे यांनी दिली. 

Chandrapur Mahanagarpalika Election 2026: चंद्रपूर महानगरपालिकेतील संख्याबळ

एकूण जागा 66

काँग्रेस 27काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेली जनविकास सेना 3भाजप 23शिंदेंसेना 1उबाठा शिवसेना 6वंचित 2बसपा 1अपक्ष (काँग्रेस बंडखोर) 2एमआयएम 1

आणखी वाचा

ठाकरे गटाचे संदीप गिऱ्हे रागाने बैठकीतून निघून गेले, विजय वडेट्टीवार म्हणाले, 'त्यांच्याकडे भाजपची ऑफर, आम्ही 15 मिनिटांत निर्णय घेऊ'