Chandrapur Mayor Election 2026: गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेत मंगळवारी ठाकरे गटाने अचानक पाठिंबा दिल्यामुळे भाजपने सत्तास्थापन करत आपला महापौर बसवला. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा धक्का बसला. भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर झाल्या आहेत. तर ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे चंद्रपूर महानगरपालिकेचे (Chandrapur Mahangarpalika) उपमहापौर झाले आहेत. उपमहापौर पदासाठी झालेल्या मतदानात काँग्रेस समर्थित जनविकास सेनेचे उमेदवार पप्पू देशमुख आणि भाजप समर्थित शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रशांत दानव यांना समसमान 32-32 मते मिळाल्याने निवडणूक अडचणीत सापडली. अखेर ईश्वर चिठ्ठीने उपमहापौर पदाचा फैसला करण्यात आला. मात्र, या सगळ्यानंतर ठाकरे गटाचे सहा नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच अंधारात ठेवून भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

Continues below advertisement

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी चंद्रपूरमधील नगरसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. हे कुणाच्याही परवानगीविना घडलेल दिसतेय. पक्षाची भूमिका ही भाजपसोबत जाण्याची मुळीच नाही. त्यामुळे स्थानिक शाखेने असा निर्णय का घेतला याची पूर्णपणे माहिती घेऊन त्यावर पक्ष योग्य ती पावल उचलून संघटनात्मक स्थळावर निश्चित उचलेल, असे अंबादास दानवे यांनी म्हटले होते. या सगळ्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू मांडली.

अंबादास दानवे साहेब आमचे नेते आहेत. त्यांनी योग्य माहिती मिळालेली नाही, आता मी त्यांना सविस्तर माहिती देईन. या सगळ्यात मी वरुण सरदेसाई यांच्या संपर्कात होतो. त्यांना आणि उद्धव ठाकरे यांना मी सगळ्या गोष्टी सांगत होतो. वरुण सरदेसाई म्हणाले होते की, आपला पक्ष सांभाळा. आपले कार्यकर्ते, नगरसेवक सांभाळा, पक्ष एकसंध राहिला पाहिजे. त्यासाठी जो निर्णय योग्य वाटेत तो घ्या, असे वरुण सरदेसाई यांनी आपल्याला सांगितल्याचे संदीप गिऱ्हे यांनी स्पष्ट केले.

Continues below advertisement

संजय राऊत साहेब चंद्रपूरमध्ये भाजपसोबत जाणार नाही, असे सकाळीच म्हणाले होते. सकाळपर्यंत आमची भूमिका तीच होती. मी सकाळी विजय वडेट्टीवार यांच्या घरी बसलो होतो. ठाकरे गटाच्या महापौरपदाच्या मागणीबाबत विजय वडेट्टीवार पॉझिटिव्ह होते, पण प्रतिभा धानोरकर ताईंनी नकार दिला. त्यांना आमची गरज वाटत नव्हती, त्या अन्य मार्गाने सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करत होत्या. त्यामुळे आम्हाला भाजपला पाठिंबा देण्याची भूमिका घ्यावी लागली, असे संदीप गिऱ्हे यांनी सांगितले. 

Chandrapur Mayor Election news: मला भाजप आणि काँग्रेस दोघांनी ऑफर दिली होती, पण मी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली नाही: संदीप गिऱ्हे

उद्धव ठाकरे यांच्याकडून नाशिकमधील नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी चर्चा रंगली आहे. याबाबत बोलताना संदीप गिऱ्हे यांनी म्हटले की, मला माझ्या पक्षप्रमुखांवर पूर्ण विश्वास आहे. ते माझ्यावर कारवाई करणार नाहीत. मला स्वत:च्या फायद्यासाठी निर्णय घ्यायचा असता तर मला भाजप आणि काँग्रेस दोन्ही  पक्षांकडून ऑफर होती. तुमच्या बायकोला आमच्या पक्षात पाठवा, महापौर करु, असे दोन्ही पक्षांनी म्हटले होते. पण मी कुठेही गेलो नाही. माझी पत्नीही म्हणाली, मी महापौर झाले तर उद्धव साहेबांच्या पक्षातूनच होईन. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करु शकत नाही, असे त्यांना सांगितले. त्यामुळे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर उद्धव ठाकरे साहेब मला माफ करतील, असे संदीप गिऱ्हे यांनी म्हटले.

Chandrapur Mahanagarpalika Election 2026: चंद्रपूर महानगरपालिकेतील संख्याबळ

एकूण जागा 66

काँग्रेस 27काँग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी असलेली जनविकास सेना 3भाजप 23शिंदेंसेना 1उबाठा शिवसेना 6वंचित 2बसपा 1अपक्ष (काँग्रेस बंडखोर) 2एमआयएम 1

आणखी वाचा

मोठी बातमी: चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाचा धक्कादायक निर्णय, भाजपला पाठिंबा, महापौरपदासाठी काय फॉर्म्युला ठरला?