Chandrapur Congress News चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस (Congress) अंतर्गत असलेला खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) विरुद्ध आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आल्याचेबघायला मिळालंय. महानगरपालिकेतील (Chandrapur) काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांना बदलवण्यासाठी 15 जून म्हणजे सोमवारी सकाळी 11 वाजता खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली आहे. वडेट्टीवार गटाचे 5 नगरसेवक धानोरकर गटात गेल्यामुळे धानोरकर गटाचं पारडं महानगरपालिकेत जड झाल्याची चर्चा आहे. वडेट्टीवार गटात असलेले सुनील खंडेलवाल, वनश्री मेश्राम, करुणा चालखुरे, शिला सिडाम आणि आकाश मानकर हे नगरसेवक आता धानोरकर गटात सामील झाले आहेत. (Chandrapur Vidhan Parishad Election 2026)
 
दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत असलेल्या काँग्रेसच्या 27 नगरसेवकांपैकी आतापर्यंत वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांची संख्या 17 होती. तर धानोरकर समर्थक नगरसेवकांची संख्या 10 होती. मात्र 5 नगरसेवकांनी गट बदलताच धानोरकर समर्थक नगरसेवकांची संख्या 15 झाली आहे. तर वडेट्टीवर समर्थक नगरसेवकांची संख्या 12 वर आली आहे. त्यामुळे वडेट्टीवार समर्थक असलेल्या राजेश अडूर यांना गटनेते पदावरून हटवण्यासाठी धानोरकर गटाने हालचाली सुरू केल्या आहेत.
 
Pratibha Dhanorkar vs Vijay Wadettiwar : धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार वादाचा पुन्हा नवीन अध्याय?
 
चंद्रपूर महानगरपालिकेत निवडणूक निकालानंतर गटनेते पदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये नगरसेवकांची पळवापळवी पासून ते अपहरणाच्या प्रयत्नापर्यंत मोठं नाट्य रंगलं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार वादाचा नवीन अध्याय पाहायला मिळणार का? आणि गटनेता बदलवण्यासाठी आवश्यक असलेलं दोन तृतीयांश बहुमत म्हणजे 18 नगरसेवकांची जुळवा जुळव खासदार धानोरकर करणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेआहे.

Chandrapur : किंगमेकर, धुरंदर, विजयाचा हुकमी एक्का...;चंद्रपूर शहरात लागलेल्या पोस्टर्समुळे राजकीय चर्चा तापली

चंद्रपुरात गेल्या काही वर्षात भाजपमध्ये किशोर जोरगेवार विरुद्ध सुधीर मुनगंटीवार असाच संघर्ष पाहायला मिळत होता. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत चिमूर चे आमदार बंटी भांगडिया यांनी भाजपला एकहाती आणि निर्विरोध विजय मिळवून दिला, सध्या बंटी भांगडीया यांनी मिळवून दिलेल्या या विजयावर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून चंद्रपूर शहरात सर्वत्र धुरंदर आणि किंगमेकर अशा आशयाचे बंटी भांगडिया यांचे पोस्टर ठीकठिकाणी लागली आहे. चंद्रपूर शहर म्हटलं की सुधीर मुनगंटीवार असं समीकरण असताना गेल्या काही वर्षात किशोर जोरगेवार यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली. मात्र आता बंटी भांगडिया यांच्या रूपाने भाजपचे नवीन नेतृत्व चंद्रपूर जिल्ह्याला मिळते का? अशी चर्चा निर्माण झाली आहे. बंटी भांगडीया हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे असल्यामुळे आणि चिमूर मतदार संघातून सलग तीन वेळा विजयी झाल्याने देखील या चर्चांना बळ मिळाला आहे.