Chandrapur News : चंद्रपूर मधील काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar)आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) गटातील नगरसेवकांच्या गट नोंदणीचा वाद आता नागपूर विभागीय आयुक्त यांच्या ऐवजी शासनाच्या दारी चालणार आहे. प्रतिभा धानोरकर गटातील 13 नगरसेवकांनी 23 जानेवारीला नागपूरच्या विभागीय आयुक्तांसमोर त्यांचा गट नोंदवल्यानंतर त्याच दिवशी वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनी त्यासंदर्भात विभागीय आयुक्त यांच्यासमोर आक्षेप नोंदवत काँग्रेसची एकत्रित गट नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. (Chandrapur Congress)

Chandrapur Congress : काँग्रेसच्या गट नोंदणीचा वाद जर शासन दरबारी सुटला नाही, तर...

दरम्यान, त्या संदर्भात नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रकरण शासनाकडे प्रस्तावित करत शासनाने नियमानुसार निर्णय करावं, अशी शिफारस केल्याची माहिती आहे. दरम्यान 10 फेब्रुवारी रोजी चंद्रपूरच्या महापौर पदाची निवडणूक होणार आहे. तोवर प्रलंबित असलेला काँग्रेसच्या गट नोंदणीचा वाद जर शासन दरबारी सुटला नाही, तर नोंदणी न झालेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांना मतदान करता येईल की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Chandrapur Mayor : चंद्रपूरच्या महापौर पदाची 10 फेब्रुवारी रोजी निवडणूक

दरम्यान, एबीपी माझा ला मिळालेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारीपर्यंत शासनाकडे पाठवण्यात आलेला काँग्रेसचा गट नोंदणीचा वाद सुटला नाही, तर वडेट्टीवार गटातील नगरसेवकाना (ज्यांची नोंदणी अजून झालेली नाही) महापौर निवड प्रक्रियेत मतदान करण्यासाठी विभागीय आयुक्तांसमोर एक विशेष शपथपत्र देऊन मतदान करावं लागेल. त्यामुळेयावादात नेमकाकायतोडगानिघणारहेपाहणेमहत्वाचंठरणारआहे.

Chandrapur Congress : वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या घरावर लावली नोटीस

दुसरीकडे, चंद्रपूर शहरातील काँग्रेसमधील धानोरकर आणि वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांमधील गटबाजी विचित्र वळणावर येऊनठेपलीआहे. धानोरकर गटाच्या 7 नगरसेवकांच्या घरावर वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकाने नोटीस लावलीआहे. राजेश अडुर यांनी स्वतःच्या घरी आयोजित केलेल्या बैठकीला सर्व नगरसेवकांना हजर राहण्याचे आवाहन केलेआहे. मात्र नोटीस मधील मजकूर आणि वेळ यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नोटीसमध्ये बैठकीची वेळ ही रविवारी दुपारी 12 वाजता असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर धानोरकर गटाचे नगरसेवक राहुल घोटेकर यांच्या घरावर ही नोटीस रविवारी दुपारी 2 वाजता लावण्यात आली आहे.

Congress : नगरसेवकांच्या घरावर चिटकवणे हे कितपत योग्य? चर्चेलाऊत

काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आमदार वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर अशा दोन गटात विभागले आहेत. वडेट्टीवार यांच्याकडे 20 तर धानोरकर यांच्याकडे 7 नगरसेवक असल्याची माहिती आहे. अशातच वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व 27 नगरसेवकांची बैठक बोलावली. या बैठकीची नोटीस धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या हाती देण्याऐवजी त्यांच्या घरावर नोटीस चिपकविण्यात आली. एखाद्याच्या घरावर कुठलीही नोटीस कुठल्याही संदर्भात चिपकवणे हे अवमानकारक मानले जाते. अशा स्थितीत पक्षाच्या अंतर्गत बाबींची नोटीस नगरसेवकांच्या घरावर चिटकवणे हे कितपत योग्य आहे? याबाबतही चर्चाना ऊत आला आहे. या कृतीतून काँग्रेस पक्षात दोन्ही किती खोलवर गेली आहे हेही स्पष्ट झाले आहे.

चंद्रपूर : एकूण नगरसेवक 66 (Chandrapur Election 2026 Result)

सध्याचे संख्याबळ

भाजप – 23

काँग्रेस – 27

काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6

वंचित - 2

बसपा - 1

शिवसेना (शिंदे गट) – 1

अपक्ष – 2

एमआयएम – 1

ही बातमी वाचा: