एक्स्प्लोर

Chandrapur : महापौर- उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्याला जोरगेवारांना डावललं,जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांचा बहिष्कार,चंद्रपूर भाजपमध्ये वादाचा भडका

Chandrapur :  चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या अचानक घेण्यात आलेल्या पदग्रहण सोहळ्यात पुन्हा एकदा मुनगंटीवार-जोरगेवार वादाचा उडाला भडका

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत महापौरपद मिळवणाऱ्या भाजपमधील धुसफूस सुरुच आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या अचानक घेण्यात आलेल्या पदग्रहण सोहळ्यात पुन्हा एकदा मुनगंटीवार-जोरगेवार वादाचा भडका उडाला आहे. चंद्रपूर शहराचे स्थानिक आमदार असूनही किशोर जोरगेवार यांना पदग्रहणासाठी बोलवण्यात न आल्याचं म्हणत जोरगेवार गटाच्या 16 नगरसेवकांनी पदग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तर या प्रकरणात 'तो मी नव्हेच' अशी भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. 

भाजपमध्ये दोन गटात वादाचा भडका

आज दुपारी केंद्रीय अर्थसंकल्पावर आयोजित केलेली प्रेस कॉन्फरन्स संपल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अचानक महापौर आणि उपमहापौर यांचा पदग्रहण सोहळा होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर तातडीने सर्व भाजप कार्यकर्ते आणि मुनगंटीवार समर्थक नगरसेवक महानगरपालिकेत दाखल झाले. अचानक होणाऱ्या या पदग्रहण सोहळ्याची कुणकुण लागतात जोरगेवार समर्थक नगरसेवक देखील महानगरपालिकेत दाखल झाले आणि त्यानंतर जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी जोरगेवारांना का बोलावलं नाही असा सवाल करत पदग्रहण कार्यक्रमावर बहिष्कार घातला. यामुळे मुनगंटीवार-जोरगेवार वादाचा पुन्हा एक नवीन अध्याय पाहायला मिळाला आहे.

महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यावर बहिष्कार घालणाऱ्या नगरसेवकांबद्दल सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले जे गेले त्यांना जाऊ द्या, ते भाजपवर टीका करणारे लोक आहेत. पक्ष त्यांची दखल घेईल, त्यांना निमंत्रण दिलं होतं, त्यांना काय करायचं ते करू द्या.

किशोर जोरगेवार यांना का बोलवण्यात आलं नाही याबाबत मुनगंटीवार म्हणाले की त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या, बोलवलं नसेल तर मला माहित नाही. हा कार्यक्रम घाई घाई ने घेण्यात आला अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यात निमंत्रित न करण्याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ज्याने कोणी हे केलं आहे त्याचा मी निषेध करतो आणि चंद्रपुरात मला न बोलवण्याची मुनगंटीवार यांनी आता ही परंपरा सुरू केली आहे आणि आज तर हद्दच झाली आहे, पक्षाच्या महापौराच्या पदग्रहणाचं मला निमंत्रण देखील देण्यात आला नाही, असं जोरगेवार म्हणाले. 

संगीता खांडेकर यांच्या निवडीनंतर मी त्यांचा अभिनंदन केलं पण त्यांनी मला आज साधा फोन देखील केला नाही, याचं मला अतिशय दुःख आहे, असं आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. संगीता खांडेकर महापौर व्हाव्यात म्हणून मी जेवढे कष्ट घेतले असतील तेवढे कदाचित कुणी घेतले नसतील.  अशा प्रकारची वागणूक आपल्या कार्यकर्त्यांना द्यायला सांगणं हे काही मोठेपणाचं लक्षण नाही, माणूस पदांनी नाही तर मनाने मोठा होतो, असंही जोरगेवार म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: 'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी
'मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ', पेट्रोलियम लॉबीविरोधात नितीन गडकरींची जोरदार टोलेबाजी
Rohit Pawar and Eknath Shinde: होय, त्यावेळी इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता; एकनाथ शिंदेंनी कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा
होय, त्यावेळी इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता; एकनाथ शिंदेंनी कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा
Ajit Pawar NCP : दादांच्या पाठीमागे आमदारसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकत्यांवर अन्याय का? पुण्यात झळकले बॅनर, नेमकं प्रकरण काय?
दादांच्या पाठीमागे आमदारसाहेबांचा सर्वसामान्य कार्यकत्यांवर अन्याय का? पुण्यात झळकले बॅनर, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसकंल्प, लाडकी बहीणचा हप्ता वाढणार? लाईव्ह अपडेटस
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसकंल्प, लाईव्ह अपडेटस एका क्लिकवर
Share Market Fall : शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
नेतृत्व संपूनही इराणकडून 9 देशातील 14 अमेरिकन एअरबेस उद्ध्वस्त, दुबईसकट मित्र देश सुद्धा होरपळले; आता ट्रम्प इराणी लष्कराला मरणाची 'भीती' दाखवत काय म्हणाले?
Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Pawar and Eknath Shinde: होय, त्यावेळी इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता; एकनाथ शिंदेंनी कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा
होय, त्यावेळी इराणने माझं विमान पाडण्याचा इशारा दिला होता; एकनाथ शिंदेंनी कबुली दिल्याचा रोहित पवारांचा दावा
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
Embed widget