Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस हे सर्वगुणसंपन्न आहेत. ते अनेक भूमिका लीलया पार पाडतात, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. ते रविवारी 'देवाभाऊ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्यांनी म्हटले की, एक तर नक्की आहे, या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळालेली आहे. कारण एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात. म्हणजे तो संघटकही असतो, राज्यकर्ताही असतो, मित्रही असतो, तो वाचतोही प्रचंड, लिहतोही प्रचंड, तो कुटुंबवत्सलही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील घटना लक्षात ठेवून तो अभिनंदन आणि सांत्वन करतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. (Maharashtra Politics news)
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी एका माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेखही केला. मी त्या मुख्यमंत्र्यांचं नाव सांगणार नाही, मी केवळ वर्णन करेन, तुम्हाला समजून जाईल, असे त्यांनी म्हटले. या मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या कामाचा प्रस्ताव घेऊन गेल्यानंतर ते उभे राहायचे. तुमचं निवेदन वाचायचे आणि त्यावर पेनाने खुणा करायचे. लोकांना वाटायचं की, मुख्यमंत्री इतक्या गांभीर्याने निवेदन वाचत आहेत म्हणजे काम करायला घेतील. पण नंतर हे मुख्यमंत्री ते काम करायचे नाहीत. याबाबत पुन्हा विचारणा केल्यानंतर मुख्यमंत्री सांगायचे की, 'मी नंतर सांगतो तुम्हाला'. 100 पैकी 99 जणांना असंच उत्तर मिळायचं, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
Raj Thackeray: राज ठाकरेंची चंद्रकांत पाटलांवर टीका
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. चंद्रकांत पाटील यांच्यासारखे व्यक्ती आमचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आहेत. आपण काय बोलतोय, जग कुठे चाललंय, याचा विचार करायला पाहिजे. आपण महाराष्ट्राचे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहोत. पण चंद्रकांत पाटील म्हणतात की, आंदोलनात जे दगड फेकण्यात आले आहेत, त्या दगडावरच्या फुटप्रिंटस आधारशी लिंक केल्या जाणार आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणतात. मला चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी या माणसाला ज्ञान मिळावं म्हणून कोल्हापूरवरुन पुण्यात पाठवलं, जे शिक्षणाचं माहेरघर आहे, पण तिथेही यांचं काही झालं नाही. आता असे शिक्षणमंत्री म्हटल्यावर जेन झी पिढीचा पारा चढणार की नाही? ते म्हणत असतील की, अशी माणसं आमच्या नशिबी आणून ठेवलेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
आणखी वाचा
