Chandrakant Khaire: राजू शिंदेचा पक्षाला 'जय महाराष्ट्र' तिकडे चंद्रकांत खैरेंच्या संतापाचा पारा चढला, म्हणाले, राजू शिंदे डरपोक, त्याला दाढीचे केस नाहीत
महापालिकेच्या तोंडावर राजू शिंदेंनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने मोठी चर्चा आहे. राजीनामा पत्रात चंद्रकांत खैरेंवर नाराज असल्याचा उल्लेख केल्याने राजकारणाला वेग आलाय.

Chhatrapati Sambhajinagar: चंद्रकांत खैरेंवर नाराज असल्याचा राजीनामा पत्रात उल्लेख करत राजू शिंदेंनी त्यांच्या समर्थकांसह उद्धवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर चंद्रकांत खैरेंनी राजू शिंदेंच्या राजीमान्याच्या आरोपामुळे चंद्रकांत खैरेंचा पारा चांगलाच चढल्याचं दिसलं. विधानसभा निवडणुकीत राजू शिंदेंसाठी काम केलं नाही म्हणाला तर तोंडात मारेन. राजू शिंदे डरपोक आहे. त्याला दाढीचे केस नाही अशी खोचक टीका चंद्रकांत खैरेंनी केलीय. (Raju Shinde) दरम्यान, राजू शिंदेंच्या आरोपावर माझ्यावर कुणी आरोप करत नाही.मात्र एका व्यक्तीने राजीनामा दिला.ती व्यक्ती मनपा मध्ये शिवसेनेला त्रास देत होता.योजना होऊ द्यायचं नाही हे त्याच धोरण आहे.जे जे मला त्रास देईल त्याला भद्रा मारुती डोक्यात गदा मारेल असा टोलाही त्यांनी लगावलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बोलत होते. औरंगजेबाच्या कबरीसह, पक्षाच्या गळतीवरही ते बोलले. (Chandrakant Khaire)
विधानसभा निवडणूकीआधी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून संजय शिरसाटांविरोधात उबाठा गटाकडून उमेदवारी असलेल्या राजू शिंदेंचा पराभव झाला होता. त्यामुळे चंद्रकांत खैरे आणि इतर पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा होती. आता महापालिकेच्या तोंडावर राजू शिंदेंनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने मोठी चर्चा आहे. राजीनामा पत्रात चंद्रकांत खैरेंवर नाराज असल्याचा उल्लेख केल्याने राजकारणाला वेग आलाय.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे?
'माझ्यावर कुणी आरोप करत नाही.मात्र एका व्यक्तीने राजीनामा दिला.ती व्यक्ती मनपा मध्ये शिवसेनेला त्रास देत होता.योजना होऊ द्यायचं नाही हे त्याच धोरण आहे.चिकलठाणा येथे ब्लॅकमेल करण्याचं काम करतो.माझ्या निवडणुकीत विरोधात काम केलं.आमच्या एका नेत्याने त्याला आणला तिकीट मिळवून दिलं.पक्षाचा आदेश असल्याने मी त्याच काम केलं.पराभव झाल्यानंतर तो दिसला नाही.त्याने काही जाहिराती दिल्या त्यात एकट्या व्यक्तीचा फोटो होता.तो शिवसेना पक्षात येऊन त्याने पक्ष डिस्टब केलं आहे.त्याच्याबद्दल बोलून मी त्याला मोठ करत नाही.तो येतो जातो येतो जातो अस त्याच काम आहे.मागच्या वेळी 42 हजार मत मिळाली.यावेळी शिवसेने मुळे 1 लाखावर गेली आहे.राजू शिंदे निवडणुकात मी 2500 लोकांना फोन केलं,अस असताना माझ्यावर आरोप करत आहे.सिल्लोड येथील बनकर याने ॲडजस्ट करून पक्षात आला.त्याने सत्तार सोबत जुळवून घेतलं होत.सत्तार विरोधात हिरवा साप म्हणून बोलायचो.मी काम करून आरोप होतो.मी मात्र एकनिष्ठ शिवसैनिक आहे. असेही चंद्रकांत खैरे म्हणाले.काही कारणास्तव म्हणतो काय कारण आहे ते सांगावा.अंबादास दानवे याच कौतुक केलं कारण दानवे याने त्याला पक्षात घेतलं होत.त्यामुळे यांच्या विरोधात बोलत नाही. विधानसभा निवडणुकीत राजू शिंदेसाठी काम केलं नाही म्हणाला तर त्याच्या तोंडात मारेन राजू शिंदे डारफोक आहे त्याला दाढीचे केस नाही.जे जे मला त्रास देईल त्याला भद्रा मारुती डोक्यात गदा मारेल.असेही खैरे म्हणाले.
अंबादास दानवे ऐकत नाहीत, खैरे म्ळणाले...
गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाला गळती लागल्याची चर्चा आहे. गेल्या दोन महिन्यात अनेकजण पक्ष सोडून शिंदे गट, भाजपात गेले आहेत. दरम्यान खैरे म्हणाले,आमच्या पक्षात इकडेचे तिकडचे लोक गेले असतील.वाफ्व बोर्ड बद्दल काय भूमिका आहे.ते मतदान झाल्यावर सांगणार आहे.उमेदवारी देताना स्थानिक नेत्यांनी पक्षाची चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली यामुळे पक्षच नुकसा झालं.अंबादास दानवे आमच ऐकत नाही.उद्धव ठाकरे यांच्यासमोर वाद मिटल्यानंतर देखील दानवे माझं ऐकत नाही.कार्यक्रमात बोलत नाही.दानवे ऑगस्ट पर्यंत आहे.आम्ही तेव्हा हंडा मोर्चा काढला होता.तेव्हा व्यक्तींच्या डोक्यात हंडा फोडणार आहे.
बीडमध्ये जे सुरू आहे जस कुणाच लक्ष नाही अस सुरू आहे.राज्यात कायदा सुव्यवस्था बिडघडली आहे.औरंगजेब यांची कबर 400 वर्ष जुनी आहे.त्यावरुन राजकारण सुरू आहे.महिलांना दिलेला 2100रुपयांची शब्द पूर्ण झाला नाही.काही लोकांनी खोके दिले यामुळे अर्थव्यवस्था डळमळली आहे.निवडणुका लवकर होतील अस वाटत नाही.तयारी करणारे थकले आहे.महाराष्ट्राचं चित्र वेगळ्या पद्धतीने सुरू आहे.आमचे अनेक आमदार इथे निवडून आले.आता आमदारा खासदार नाही.अशी परिस्थिती 1988 मध्ये देखील होती.तेव्हा बाळासाहेबांच्या नेतृत्वात आम्ही यश मिळवलं आहे.औरंगजेब ची कबर आपल्या शहरात आहे. मुख्यमंत्र्यांच्या गावात नागपूरमध्ये दंगल झाली.
हेही वाचा:
Ajit Pawar On Beed: राख गँगला सुतासारखं सरळ करणार, बीडमध्ये जाऊन अजित पवारांनी दम भरला, मराठा-वंजारी वादावरुनही खडसावलं
























