एक्स्प्लोर

आधी म्हणाले, अंबादास काड्या करतो, आता वाद मिटला; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर खैरेंनी पुढचा प्लॅन सांगितला

उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली आहे. काही कार्यक्रम पक्षाकडून आखले जाणार आहेत, त्याबाबत त्यांच्याशी बोलणं झालं, अशी माहिती शिवसेनेतील ते चंद्रकांत खैरे यांनी दिली.

मुंबई : शिवसेना युबीटी पक्षातील छत्रपती संभाजीनगरमधील नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि त्यांच्या दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन वाद झाला होता. त्यावेळी, अंबादास मागून आला आणि काड्या करतो, इथं शिवसेना मी वाढवली, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर जोरदार टीका केली होती. तसेच, यासंदर्भात मी पक्षप्रमुखांकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, खैरे यांनी आज उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) मातोश्रीवर चर्चा केल्यानंतर दानवेंसोबतचा वाद मिटल्याचे जाहीर केले. त्यामुळे, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्षातील या वादावर आता पडदा पडला आहे. विशेष म्हणजे आता दोघेही एकत्र येऊन कार्यक्रम घेणार आहोत, पक्षाचं काम करणार आहोत, असेही खैरे यांनी स्पष्ट केले. 

उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून कार्यक्रमासंदर्भात चर्चा झाली आहे. काही कार्यक्रम पक्षाकडून आखले जाणार आहेत, त्याबाबत त्यांच्याशी बोलणं झालं, अशी माहिती शिवसेनेतील ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली. तसेच, अंबादास दानवे आणि माझा वाद केव्हाच मिटला आहे. यापुढे आम्ही दोघे मिळून एकत्र कार्यक्रम करणार आहोत, तो एकटा किंवा मी एकटा कार्यक्रम करणार नाहीत, सोबत म्हणून कार्यक्रम करणार आहोत, असे स्पष्टीकरणही खैरे यांनी दिले. दरम्यान, आज सुद्धा सेना भवनला बैठक आहे, त्यावेळी मी आणि अंबादास दानवे सोबत बैठकीला असणार आहोत, असेही खैरेंनी सांगितले. त्यामुळे, दोन्ही नेत्यांमधील वादाचा मुद्दा आता संपुष्टात आल्याचे स्पष्ट झालं आहे. 

15 जूनला उद्धव ठाकरे संभाजीनगरला

संभाजीनगरमधील मेळाव्याच्या कार्यक्रमाला मला निमंत्रण नव्हतं. शिवाय त्या मेळाव्याच्या दिवशी माझ्या समाजाचा कार्यक्रम आधीपासून ठरलेला होता, त्यासाठी मी तिकडे गेलो होतो. त्यामुळे मेळाव्याला जाऊ शकलो नाही. उद्धव ठाकरेंना मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि आता वाद मिटलेला आहे, असे म्हणत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यासोबतचा वाद संपुष्टात आल्याचे म्हटले. तर, 15 जूनला उद्धव ठाकरे संभाजीनगरला येथे, शिवसेना भवनचे उद्घाटन आहे, याशिवाय शिबिर सुद्धा घेतील. आदित्य ठाकरे सुद्धा 15 मे च्या दरम्यान हंडा मोर्चासाठी संभाजीनगरला येतील, अशी माहिती देखील खैरे यांनी दिली.

हेही वाचा

पुण्यात चाललंय काय, दिवसाढवळ्या सराफ दुकानावर दरोडा; प्लॅस्टिकच्या बंदुकीचा धाक दाखवून 25 तोळे लुटले

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News LIVE Updates: वाशिममध्ये चौथ्या दिवशीही डिझेलचा ठणठणाट; वाहनधारकांची मोठी दमछाक, वाहनाची चाके थांबण्याचे चित्र
Maharashtra News LIVE Updates: वाशिममध्ये चौथ्या दिवशीही डिझेलचा ठणठणाट; वाहनधारकांची मोठी दमछाक, वाहनाची चाके थांबण्याचे चित्र
Gopichand Padalkar on Jayant Patil: पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन जयंत पाटलांनी मोदींना टोला हाणला, गोपीचंद पडळकरांचा पलटवार, म्हणाले...
पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन जयंत पाटलांनी मोदींना टोला हाणला, गोपीचंद पडळकरांचा पलटवार, म्हणाले...
Kamal Haasan Meets Tamil Nadu CM Thalapathy Vijay: मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या भेटीसाठी तातडीनं पोहोचले सुपरस्टार कमल हसन; समोर ठेवल्या 6 महत्त्वाच्या मागण्या
मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या भेटीसाठी तातडीनं पोहोचले सुपरस्टार कमल हसन; नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Silver Kolhapuri: महागाई गेली तेल लावत, अधिक मासाच्या वाणासाठी जावयाला दीड किलोची चांदीची कोल्हापूरी चप्पल
महागाई गेली तेल लावत, अधिक मासाच्या वाणासाठी जावयाला दीड किलोची चांदीची कोल्हापूरी चप्पल
Onion Price Drop: केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
Maharashtra News LIVE Updates: वाशिममध्ये चौथ्या दिवशीही डिझेलचा ठणठणाट; वाहनधारकांची मोठी दमछाक, वाहनाची चाके थांबण्याचे चित्र
Maharashtra News LIVE Updates: वाशिममध्ये चौथ्या दिवशीही डिझेलचा ठणठणाट; वाहनधारकांची मोठी दमछाक, वाहनाची चाके थांबण्याचे चित्र
Kerala : केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Gopichand Padalkar : नरेंद्र मोदींचं आवाहन, चारचाकी वाहन सोडून गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा सांगलीच्या फेमस टांग्यातून पाच किलोमीटर प्रवास
मोदींची साद, भाजप नेत्यांचा प्रतिसाद, अलिशान वाहनांच्या ताफ्याला फाटा, गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा टांग्यातून प्रवास
Donald Trump Threat to Iran : घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
Embed widget