Ujjwal Nikam : तीस दिवस किंवा त्यापेक्षा जास्त जर कोणताही नेता तुरुंगात राहिला असेल मग तो पंतप्रधान (Prime Minister) मुख्यमंत्री (Chief Minister) असो वा मंत्री असो,अशा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या पदावर राहता येणार नाही, असा कायदा आणण्याचा केंद्र सरकारचा (Central Government) प्रयत्न असून लवकरच त्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचीमहत्वपूर्णमाहिती ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी दिली आहे. दरम्यान, असा कायदा करण्याच्या निर्णय हा देशात ऐतिहासिक आणि क्रांतिकारी ठरणार असल्याचं सांगत उज्वल निकम यांनी हा कायदा आणायच्या हालचाली सुरू झाल्या असून, हा कायदा अमलात आणताना त्यात कोणत्याही उणिवा राहू नये, तो प्रभावी पणाने अमलात यावा, यासाठी देशाच्या लोकसभा आणि राज्यसभेचे सभासद यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. त्यात विविध राज्याच्या सचिवांच्या सोबत बैठका घेऊन कायदा अधिक प्रभावी रित्या कसा वापरता येईल, आणि कसा आणता येईल, यावर चर्चा होत असल्याच ही उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी म्हटल आहे.
Ujjwal Nikam : पंतप्रधान मोदी यांनी जनतेला काटकसरीचे आवाहन केले याचा अर्थ भीती दाखवली असा नव्हे, तर....
जगा पाठोपाठ आगामी काळात देशावर आर्थिक संकट येण्याची शक्यता लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल, डिझेल, यासह सोने खरेदी बाबत जनतेला काटकसरीचे आवाहन केले आहे. याचा अर्थ त्यांनी भीती दाखवली असा नव्हे, तर कोणत्याही परिस्थितीला आपण सामोरे जाताना सावधानकी बाळगली पाहिजे, यासाठी पंतप्रधानांनी आव्हान केले असल्याच उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी जनतेला केले होते हे आवाहन
हैदराबादमध्ये जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, "मी देशातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की, त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर शक्य तितका कमी करावा. मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करा आणि कारपूलिंगला प्रोत्साहन द्या. ज्यांच्याकडे कार आहे, त्यांनी एकाच गाडीतून जास्तीत जास्त लोकांना सोबत नेले पाहिजे."
Narendra Modi : नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली?
सोन्याची खरेदी टाळापेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यापरदेश प्रवास टाळाखाद्यतेलाचा वापर कमी करानैसर्गिक शेतीचा अवलंब करास्वदेशी उत्पादनं वापरा
इतर महत्वाच्या बातम्या
