Buldhana News : बुलढाण्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी या संदर्भात सूचक वक्तव्य करत या विषयावर भाष्य केलंय. यावेळी बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, आता बुलढाण्यात महायुती होईल असं काही वाटत नाही. कारण नुकतीच बुलढाण्यातील उमेदवाराला भाजपने मान्यता दिली आहे.

Continues below advertisement

उबाठा (Shivsena UBT) आणि काँग्रेसचही (Congress) ठरलं आहे. मात्र त्यांचा उमेदवार जाहीर झाला नाही. आम्ही उमेदवाराच्या शोधात आहोत, मात्र आम्हाला चांगला उमेदवार सापडला नाही. जिल्ह्यात अद्याप युतीची चर्चा नाही. आम्ही प्रस्ताव दिला आहे, मात्र अद्याप चर्चा कुणाकडूनच नाही. असे ते म्हणाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत एकी झाल्याचे चित्र दिसत आहे.

Bhandara : भंडाऱ्यात ठाकरेंची शिवसेनेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत

भंडारा जिल्ह्यातील चार नगरपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व एकत्रित पक्षांनी आघाडीत निवडणूक लढवावी, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, आम्हाला जर अन्य पक्षांचा सहकार्य मिळालं नाही. तर, आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे भंडारा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांनी दिली. भंडाऱ्याच्या काही ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची तयारी झाली असून आघाडीची वाट नं बघता त्यांचे उमेदवारी अर्ज दाख करणार असून मुंबईत ठाकरे बंधूंचा ब्रँड चालतो. त्यामुळं मुंबई महापालिकेवर नक्कीच गवा फडकेल, असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे भंडारा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांनी व्यक्त केला आहे.

Continues below advertisement

Bhandara News : भंडारा नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांची घोषणा

भंडारा नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी जयश्री बोरकर यांच्या नावाची घोषणा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. जयश्री बोरकर या भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष असून माजी नगरसेविका आहेत. तर, भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी मधुरा मदनकर यांच्या नावाची घोषणा भाजप नेते परिणय फुके यांनी केली. मधुरा मदनकर या भंडारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका राहिलेले आहेत. भंडाऱ्यात सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढत असून उर्वरित पक्षांच्या नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदांच्या उमेदवारांची घोषणा आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

महत्वाच्या बातम्या: