एक्स्प्लोर

Buldhana News: दीड कोटींची डिफेंडर कार कोणत्या कामाच्या कमिशनमधून मिळाली? भाजप नेत्याचा शिंदे गटाच्या नेत्यावर हल्लाबोल, बुलढाण्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी

Buldhana News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच भाजप आणि शिंदे गटात जुंपल्याचं चित्र बुलढाण्यात दिसत आहे.

Buldhana News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच (Local Body Elections) बुलढाण्यात (Buldhana) महायुतीच्या (Mahayuti) दोन प्रमुख घटकांमध्ये म्हणजेच भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. एकमेकांवर कुरघोडी करताना आता आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विशेषत: दीड कोटींच्या लक्झरी लँड रोव्हर डिफेंडर (Land Rover Defender) कारवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे.

Vijay Shinde on Sanjay Gaikwad: दीड कोटींची डिफेंडर कोणत्या कामाच्या कमिशनमधून मिळाली?

भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे (Vijay Shinde) यांनी थेट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विजय शिंदे म्हणाले की, जर बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी भाजपचाच विचार होत असेल तरच युती शक्य आहे. बुलढाण्यात बेडकासारख भाषणातून युती पाहिजे... युती पाहिजे असं म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीने काल दीड कोटी रुपयांची डिफेंडर आणली. ती एका कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर असून ती कोणत्या कामातील कमिशनमुळे या लोकप्रतिनिधीला मिळाली याची चौकशी व्हावी. मतदारांना वेश्यापेक्षा खराब म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधीला लोक नाकारतील म्हणून भाजपचाच विचार व्हावा अन्यथा युती नाही, असे त्यांनी म्हटले.  

Sanjay Gaikwad on Vijay Shinde: बुलढाण्यात मोठा भाऊ मीच : संजय गायकवाड 

तर आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे की, "बुलढाण्यात शिवसेना-भाजप युती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. युती होईल अशी आम्हाला आशा आहे. भाजपने अजून एकला चलो रेचा नारा दिलेला नाही. आमची अजून चर्चा झालेली नाही. जेव्हा बैठक होईल, चर्चा होईल, त्यावेळेस जर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं लढा आणि आम्ही आमचं लढू. तर आम्ही आमचे लढू. बुलढाण्यात मोठा भाऊ मीच आहे," असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची युती होईल की नाही? हे भविष्यात ठरेलच, मात्र आतापासून भाजपा आणि शिंदे गटात जुंपल्याचं चित्र बुलढाण्यात दिसत आहे. आता बुलढाण्यात भाजप आणि शिंदे गटाची युती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad: बुलढाण्यात एक लाखांहून अधिक बोगस मतदार; मतदारयाद्यांतल्या घोळावर सत्ताधारी आमदारांचा सरकारला घरचा आहेर

Thane Crime : ठाणे महापालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळेसह इतर दोघांना दिलासा; न्यायालयाकडून अटीशर्तीसह जामीन मंजूर

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar Land Row : पार्थ पवार जमीन व्यवहार: मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, वडिलांचे हात वर
Railway Protest: 'अभियंत्यांवरील गुन्हा मागे घ्या', CSMT वरील आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Local Masjid Bander : दोषींना वाचवण्यासाठी निष्पापांचा बळी Special Report
Mahayuti Rift: 'भाजप (BJP) मित्रपक्षांना गिळणारा राक्षस आहे', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचा घणाघात
Parth Pawar Land Deal : पार्थच्या जमीन व्यवहारावर अजित पवारांनी हात झटकले? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
Bihar Election : बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचं सत्ताधारी- विरोधकांची धाकधूक वाढवणारं वक्तव्य, म्हणाले नवी व्यवस्था...
नवी व्यवस्था येत आहे, बिहारमध्ये मतदानाचा टक्का वाढताच, प्रशांत किशोर यांचा अंदाज
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
रेल्वे अभियंत्यांवरील FIR मागे घ्या , मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल सेवा पाऊण तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा सुरु
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचं ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन, लोकल पाऊण तास ठप्प, मध्य व हार्बर मार्गावरील लोकल उशिरानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
महार वतनातील जमीन म्हणजे काय, वारसदारांना विकता येते का; ब्रिटीशकालीन इतिहास काय सांगतो?
Embed widget