एक्स्प्लोर

Buldhana Nagarparishad Sanjay Gaikwad: भाजप-शिंदे गटातील संघर्ष टोकाला, संजय गायकवाड भाजपच्या जिल्हाध्यक्षाला म्हणाले, 'डान्सबारमध्ये बायकांसोबत नाचून सत्ता गमावली'

Sanjay Gaikwad: ही लढाई भाजपामध्ये आलेल्या बाहेरच्या गटाची विरुद्ध ओरिजनल भाजप आणि शिवसेना गटाची लढाई आहे. असे म्हणत आमदार संजय गायकवाड  यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्यावर बोचरी टीका केलीय.

Buldhana Nagarparishad बुलढाणा : नगरपरिषद निवडणुकीमध्ये राज्यात आमची काही ठिकाणी युती आहे, तर काही ठिकाणी आघाडी आहे. राज्यात प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. मात्र काही असलं तरी राज्यात महायुतीच यश संपादन करेल आणि महायुतीचा झेंडा फडकेल. दरम्यान, बुलढाणा(Buldhana) शहरात भाजप (BJP) आणि शिवसेना एकमेका विरोधात उभी ठाककेली नाही, तर उपऱ्या गटाचा जिल्हाप्रमुख आणि आम्ही उभे आहोत. ओरिजनल भारतीय जनता पक्षाला बुलढाण्यात युती हवी होती. मात्र त्यांनी केली नाही. ज्या घरातून भारतीय जनता पक्ष सुरू झाला त्याच लोकांना यांनी उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे ही लढाई भाजपा आणि शिवसेना नाही. भाजपामध्ये आलेल्या बाहेरच्या गटाची आणि ओरिजनल भाजपा आणि शिवसेना गटाची लढाई आहे. असे म्हणत आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे (BJP Vijay Shinde) यांच्यावर बोचरी टीका केलीय.

Sanjay Gaikwad: ....तर लोकांनी आम्हाला लाथाळलं असतं

इतक्या मोठ्या राज्यात, पक्षात काम करताना छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. थोड्याशा गोष्टीमध्ये भाजप आणि आमच्यात वित्तुष्ट येईल असं काही होणार नाही. माझ्या पत्नीला उमेदवारी देण्याचं कारण म्हणजे ती दोन वेळेस नगराध्यक्षपदी राहिलेली आहे. वीस वर्ष ती नगरसेवक राहिलेली आहे आणि मी 28 वर्ष. माझा सर्व परिवार हा जनतेसाठी लढतो. त्यामुळे जनताच म्हणते की, आम्हाला तुमच्या परिवारातील द्या. जर मी उमेदवार लादला असता तर लोकांनी आम्हाला लाथाळलं असतं, निवडून दिलं नसतं. असेही आमदार संजय गायकवाड म्हणाले.

एकेकाळी यांच्याच घरातील लोकांनी महिलांवर बलात्कार केले

जे माझ्यावर आरोप करतात त्यांना त्यांचा परिवार सुद्धा सांभाळता आला नाही. त्यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी सगळी सत्ता डान्स बारमध्ये गमावली. त्या बायकांसोबत नाचून इकडे जनतेकडे फिरकायला यांना वेळ नव्हता. यांनी कधी घरी जेवलेच नाही, कार्यकर्त्यांनाच मातीत घातलं. अशी घणाघाती टीकाही आमदार संजय गायकवाड यांनी केलीय. एकेकाळी यांच्याच घरातील लोकांनी महिलांवर बलात्कार केले. हे काय महिलांचे रक्षण करणार आहेत. असेही ते म्हणाले.

ओरिजनल भाजपचे लोक माझ्यासोबत, त्या 'उपऱ्याशी' माझी लढत नाही

बुलढाण्यात माझी लढत माझ्या मित्र पक्षाशी नाही तर. ओरिजनल भाजपचे लोक माझ्यासोबत आहेत. "त्या उपऱ्याशी" माझी लढत नाही. माझी लढत होईल तर ती काँग्रेसची होईल कारण "हा" (विजयराज शिंदे भाजपा जिल्हाध्यक्ष) काँग्रेसचा डमी उमेदवार आहे. हा एका आमदाराकडे बोलला आहे की मी जिंकण्यासाठी नाहीतर पाडण्यासाठी उभा आहे, त्यामुळे त्याचा जिंकायचा विषयच नाही.

महत्वाच्या बातम्या:

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime Ravi Landge: पिंपरीचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, थेट सीपी ऑफिसमध्ये फोन, महापौर म्हणाले, 'आधी दोन वेळा भेटलेला; पुस्तकही भेट दिलं...'
पिंपरीचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, थेट सीपी ऑफिसमध्ये फोन, महापौर म्हणाले, 'आधी दोन वेळा भेटलेला; पुस्तकही भेट दिलं...'
Rahul Gandhi and PM Modi: भारताच्या डोक्यावर आर्थिक वादळ घोंघावतय अन् आपले पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; राहुल गांधींची बोचरी टीका
भारताच्या डोक्यावर आर्थिक वादळ घोंघावतय अन् आपले पंतप्रधान चॉकलेटं वाटण्यात मश्गुल; राहुल गांधींची टीका
Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार
Maharashtra Live Blog Updates: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप, अनेक शहरांतील मेडिकल्स आज बंद राहणार
NCP Prabodh Davkhare: डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
NCP Prabodh Davkhare: डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

व्हिडीओ

PM Narendra Modi Meet Melony in Italy | वेलकम टू रोम, माय फ्रेंड! मोदींसोबत गप्पा, जॉर्जिया मेलोनींची पोस्ट
Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
बाॅयफ्रेंडसोबत राहायचं म्हणून गर्लफ्रेंडनं 1.66 कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, तीन दिवस लपले; चौथ्या दिवशी गर्लफ्रेंड हॉटेलमध्ये अंघोळीला जाताच तोच गुजराती बाॅयफ्रेंड चोरलेल्या दागिन्यांसह फरार
BAN vs PAK : बांगलादेशकडून कसोटी मालिकेत पाकिस्तानला व्हाईट वॉश, पाकिस्तानचा पराभव आणि भारताला WTC मध्ये मोठा धक्का
बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?
Weather Update: देशात गर्मीचं तांडव सुरु असतानाच अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार; मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
देशात गर्मीचं तांडव सुरु असतानाच अरबी समुद्रावर एक नवीन प्रणाली तयार; मान्सून वारे कमकुवत होण्याची भीती, पुढील दोन दिवसांचा महाराष्ट्रासह 10 राज्यांचा हवामानाचा अंदाज
PM Modi Melody: तिकडे मोदींनी मेलोनी यांना Melody चॉकलेट भेट दिलं, इकडे शेअर मार्केटमध्ये पारलेच्या स्टॉकला अप्पर सर्किट लागला, नेमकं काय घडलं, वेगळंच सत्य समोर?
तिकडे मोदींनी मेलोनी यांना Melody चॉकलेट भेट दिलं, इकडे पारलेच्या स्टॉकला अप्पर सर्किट मात्र वेगळंच सत्य समोर
PM Modi and Giorgia Meloni 'Melody' Moment : PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
PM मोदींनी मेलोडी चॉकलेट्स देताच मेलोनी खळखळून हसल्या आणि म्हणाल्या...; जगभरात व्हिडीओची चर्चा
Donald Trump: अखेर बेलगाम झालेल्या ट्रम्पचे पंख स्वत:च्या पक्षाच्या चार खासदारांनीच छाटले; इराण युद्ध थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये अखेर मंजूर; 5 मोठ्या घडामोडी
बिग ब्रेकिंग! अखेर बेलगाम झालेल्या ट्रम्पचे पंख स्वत:च्या पक्षाच्या चार खासदारांनीच छाटले; इराण युद्ध थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसमध्ये अखेर मंजूर; 5 मोठ्या घडामोडी
पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार, आपल्या भारताला विकण्याचं काम केलं; आर्थिक वादळं येणार, मोदी पुन्हा रडायचं काम करतील आणि माझी चुकी नाही म्हणतील; राहुल गांधींचा प्रहार
पंतप्रधान, गृहमंत्री गद्दार, आपल्या भारताला विकण्याचं काम केलं; आर्थिक वादळं येणार, मोदी पुन्हा रडायचं काम करतील आणि माझी चुकी नाही म्हणतील; राहुल गांधींचा प्रहार
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांना थेट झुरळासमान लेखताच आता छत्रपती संभाजीनगरच्या तरुणानं 'कॉकरोच जनता पार्टी'च सुरु केली! अभिजित दीपके आहे तरी कोण?
Embed widget