Brij Bhushan Sharan Singh Women Wrestlers Alleged Physical Harassment Case: महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने आज याबाबत निकाल जाहीर केला. बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता होताच फटाके फोडून समर्थकांनी जल्लोष केला. तर न्यायालयाच्या या निर्णयानंतर बृजभूषण शरण सिंह यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Women Wrestlers Alleged Physical Harassment Case)
महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाच्या प्रकरणात राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर, बृजभूषण शरण सिंह म्हणाले, की, आरोप झाल्यानंतर मी पहिल्याच दिवशी म्हणालो होतो की जर कोणताही आरोप सिद्ध झाला किंवा तसा निकाल लागला, तर मी स्वतःला फाशी लावून घेईन. आज न्यायालयाने माझी सन्मानाने निर्दोष मुक्तता केली आहे. माझ्यासाठी आणि माझ्या समर्थकांसाठी ही आनंदाची बाब आहे...आजचा दिवस आनंदाचा आहे, असं बृजभूषण शरण सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.
नेमकं प्रकरण काय? (Brij Bhushan Sharan Singh Women Wrestlers Alleged Physical Harassment Case)
2016 ते 2019 या काळात महासंघाचे कार्यालय, अधिकृत निवासस्थान आणि परदेश दौऱ्यात महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. 2023 मध्ये विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठे आंदोलन केले होते. आंदोलनानंतर दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल होऊन आरोपपत्र सादर झाले होते आणि खटला सुरू झाला होता. मात्र आज न्यायालयाने पुराव्यांच्या अभावी बृजभूषण सिंह आणि सहआरोपी विनोद तोमर यांना या प्रकरणातूनदोषमुक्त केले आहे. दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजी सहा वेळा खासदार राहिलेले बृजभूषण शरण सिंह विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी पोलिसांनी WFI चे निलंबित सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनाही आरोपी केले होते.
आरोपांमुळे बृजभूषण यांना लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते- (Brij Bhushan Sharan Singh Women Wrestlers Alleged Physical Harassment Case)
लैंगिक छळाचे आरोप झाल्यामुळे बृजभूषण शरण सिंह यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट नाकारण्यात आले होते. मात्र, पक्षाने त्या जागेवरून त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली. वाद असूनही, त्या मतदारसंघावरील त्यांची मजबूत पकड दिसून आली आणि त्यांचे पुत्र करण भूषण विजयी झाले. आता, दिल्ली न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर, बृजभूषण शरण सिंह पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का, हा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे.
बृजभूषण शरण सिंह यांच्यावर नेमके कोणते आरोप केले होते? (Brij Bhushan Sharan Singh Women Wrestlers Alleged Physical Harassment Case)
2016 ते 2019 या काळात महासंघाच्या कार्यालयात, शासकीय निवासस्थानी व परदेशात महिला मल्लांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी करणे, छाती, पोटावर अयोग्य स्पर्श करणे, धमकावणे आणि पाठलाग करणे असे कृत्य केल्याचा दावा तक्रारदारांनी केला होता.अल्पवयीन मल्लाच्या तक्रारीवरून 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता, जो नंतर मल्लाच्या वडिलांनी माघार घेतल्यामुळे बंद करण्यात आला.दिल्ली पोलिसांनी भादंविच्या (IPC) कलम ३५४, ३५४A आणि ३५४D अंतर्गत आरोप ठेवले होते.
