Vidhan Bhavan Maharashtra मुंबई:मुंबई विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल पाठवल्याने (Bomb Threat Vidhan Bhavan Maharashtra) एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधानभवन परिसरात सर्च आपरेशन सुरू केले आहे. सध्या विधानभवनातील कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आलं आहे. सर्च ऑपरेशन होईपर्यंत कोणालाच आत सोडले जाणार नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र थोड्यावेळेनंतर सुरक्षा तपासणी आणि योग्य तपासणी करत सर्वांना आत सोडण्यात येत आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि व्हीआयपी या परिसरात येत असतात. त्यामुळे पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे. 

Continues below advertisement

तपास झाल्याशिवाय अधिवेशन चालवू नका- रोहित पवार

तपास झाल्याशिवाय अधिवेशन चालवू नका, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणाले. फक्त भिती दाखवण्यासाठी धमकी दिली की या मागे काही आहे हे तपासलं पाहिजे. एकीकडे फारूक अब्दूल्ला यांना मारण्याचा कट होतोय तर दुसरीकडे महाराष्ट्रात बॉम्बची धमकी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण तपास केला पाहिजे, असंही रोहित पवारांनी सांगितले. 

काल माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावर केरोसीन ओतलं- (Vidhan Bhavan Maharashtra)

मुंबईतील विधानभवन परिसरात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना 11 मार्च 2026 रोजी सोलापूरच्या एका 38 वर्षीय तरुणाने अंगावर केरोसीन ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दादास बाबन कळसाईत याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. माढ्यातील जमिनीवर उभारलेला विश्वकर्माचा पुतळा नगरपंचायतीने काढल्यामुळे संताप व्यक्त केला. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आणि या सुरक्षेतील हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.ही घटना अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. 

Continues below advertisement