Ritu Tawde Mumbai Mayor: मुंबई महानगरपालिकेची सत्ता पहिल्यांदाच हस्तगत करण्यात यश मिळवलेल्या भाजपने शनिवारी महापौरपदाचा आपला उमेदवार जाहीर केला. मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 132 मधून विजयी झालेल्या भाजप नगरसेविका रितू तावडे (Ritu Tawde) यांना भाजपने महापौरपदासाठी निवडले आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप (BJP) आणि शिवसेना युतीने 114 हा बहुमताचा आकडा गाठल्याने रितू तावडे यांनी महापौरपदावरील (Mumbai Mayor) निवड ही केवळ औपचारिकता मानली जात आहे. मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाल्यानंतर मुंबईची महापौर कोण होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या शर्यतीमध्ये तेजस्वी घोसाळकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे यांचा समावेश होता. मात्र, अखेरच्या क्षणी रितू तावडे यांनी या शर्यतीमध्ये बाजी मारली.

Continues below advertisement

रितू तावडे यांची भाजपने महापौरपदासाठी केलेली निवड अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. रितू तावडे या सर्वप्रथम 2017 मध्ये घाटकोपरमच्या प्रभाग क्रमांक 121 मधून निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी वॉर्ड क्रमांक 132 मधून विजय मिळवला. त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भुषविले आहे. याशिवाय, त्या भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष राहिल्या आहेत. 18 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या रितू तावडे यांचे शिक्षण एस.वाय.बी.कॉम पर्यंत झाले आहे. त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत. 

रितू तावडे यंदा घाटकोपरच्या ज्या वॉर्ड क्रमांक 132 मधून निवडून आल्या आहेत. घाटकोपरचा वॉर्ड क्रमांक 132 चा परिसर हा गुजरातीबहुल म्हणून ओळखला जातो. या वॉर्डमध्ये विद्याविहार पूर्वेचा काही भाग, गारोडिया नगर, सोमय्या कॉलेज आणि राजावाडी रुग्णालयाचा भाग येतो. या भागात मोठ्याप्रमाणावर गुजराती आणि जैन वस्ती आहे. त्यामुळे हा वॉर्ड भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. रितू तावडे या मराठा समाजातील आहेत. मात्र, भाजपने त्यांना आपल्या गुजरातीबहुल बालेकिल्ल्यातून निवडून आणत आता थेट महापौरपदावर बसण्याची संधी दिली आहे. भाजपने रितू तावडे यांच्या रुपाने महापौरपदासाठी मराठी चेहरा दिला असला तरी अप्रत्यक्षपणे गुजराती व्होटबँकेला आश्वस्त केल्याची चर्चा आहे. गुजराती-जैन व्होटबँकेने निवडून दिलेल्या मराठी उमेदवाराला महापौरपदी बसवून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. 

Continues below advertisement

मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाने मराठी महापौरपदाच्या मुद्द्यावरुन भाजपला घेरले होते. भाजपने सुरुवातीला आपला महापौर हिंदू असेल, असे म्हटले होते. मात्र, यामुळे मराठी मतदार नाराज होतील, हे भाजपच्या लक्षात आले होते. त्यामुळे आता कोणताही वाद टाळण्यासाठी भाजपने रितू तावडे यांच्या रुपाने मुंबईच्या महापौरपदी मराठी चेहरा बसवला आहे.

आणखी वाचा

Ritu Tawade: रितू तावडे मुंबईच्या महापौरपदी तर संजय घाडी उपमहापौर, भाजप-शिवसेनेकडून घोषणा