Ritu Tawde Rolex Watch: मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) या सध्या त्यांच्या मनगटावरील घड्याळामुळे चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये त्यांनी परिधान केलेले घड्याळ तब्बल एक कोटी रुपयांचे असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला. या दाव्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले आहे.
Ritu Tawde Rolex Watch: नेमकं प्रकरण काय?
व्हायरल फोटोमध्ये दिसणारे घड्याळ हे ‘Rolex येलो गोल्ड डेटोना’ मॉडेलचे असल्याचा दावा करण्यात आला होता. या मॉडेलची किंमत सुमारे 60 ते 70 लाख रुपये असून, भारतातील बाजारमूल्य एक कोटी रुपयांहून अधिक असल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते. संबंधित पोस्ट व्हायरल होताच रितू तावडे यांना सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
Ritu Tawde Rolex Watch: रितू तावडेंचे स्पष्टीकरण
आता महापौर रितू तावडे यांनी स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. रितू तावडे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलंय की, ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
