BMC Mayor Reservation 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर (BMC Election Result 2026) आता महापौरपदाची चर्चा रंगली आहे. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

मुंबई महानगरपालिकेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि जनरल प्रवर्गातून महापौर निवडला जाणार आहे. जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाल्यास यावेळी अनुसूचित जमातीचा महापौर बनवण्याची शक्यता असल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. जुन्या चक्राकार पद्धतीने क्रम पाळला गेल्यास महायुतीला मोठा धक्का बसणार आहे. कारण महायुतीतल्या भाजप आणि शिवसेना या दोघांकडेही अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही. या प्रवर्गातील नगरसेवक केवळ ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. यामध्ये प्रियदर्शनी ठाकरे आणि जितेंद्र वळवी यांचा समावेश आहे. मात्र याच ठाकरेंच्या दोन हुकमी नगरसेवकांवर सत्ताधाऱ्यांची नजर असल्याची माहिती समोर आली आहे. (BMC Mayor Reservation 2026)

एसटी प्रवर्गातील दोन नगरसेवकांवर सत्ताधाऱ्यांची नजर- (Uddhav Thackeray Shivsena UBT)

महापौरपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होणार असल्याच्या चर्चेने सत्ताधारी पक्षांकडून दोन नगरसेवकांवर दबाव आणला जात असल्याची ठाकरे गटाकडून माहिती देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरेंकडे प्रियदर्शिनी ठाकरे आणि जितेंद्र वळवी हे एसटी प्रवर्गातील नगरसेवक आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडूनही या दोन्ही नगरसेवकांची विशेष काळजी घेतली जात आहे. मुंबईतील महापौरपदाचे आरक्षण जुन्या चक्राकार पद्धतीने झाल्यास एसटी प्रवर्गसाठी महापौरपद आरक्षित होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु नगरसेवक आरक्षणपद्धत जशी नव्याने काढली होती. त्या पद्धतीने महापौर आरक्षणही नव्याने काढले जाणार आहे. जी चक्राकार आरक्षण पद्धतीची सुरूवात समजली जाणार आहे.

Continues below advertisement

अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवक केवळ ठाकरेंच्या शिवसेनेत- (BMC Election 2026 Mumbai Mayor)

प्रभाग 53 आणि प्रभाग 121 हे दोन प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन मतदारसंघात सर्वपक्षांनी उमेदवार दिले. पण दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेच उमेदवार विजयी झाले. प्रभाग 53 मधून जितेंद्र वळवी यांनी बाजी मारली, त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेचे अशोक खांडवेंचा पराभव केला. तर प्रभाग 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे यांचा विजय झाला. प्रियदर्शनी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या उदमेवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव केला. 

महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला- (Maharashtra Municipal Corporation Mayor Reservation)

सर्व 29 महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे. 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रवर्गाचा महापौर कोणत्या नगरपालिकेमध्ये बसणार हे 22 जानेवारीला निश्चित होईल. नगरविकास विभागाकडून महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयात काढली जाईल. (Maharashtra Municipal Corporation Mayor Reservation)

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप - 89शिवसेना ठाकरे गट - 65शिवसेना - 29काँग्रेस - 24 मनसे - 6 एमआयएम- 8 एनसीपी - 3 एसपी - 2 एनसीपी शप - 1 --------------एकूण- 227

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

BMC Mayor 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?; RTI कार्यकर्ते अनिल गलगलींनी सगळं सांगितलं!