एक्स्प्लोर

BMC Mayor Election : मुंबईत भाजपचा महापौर खुर्चीत बसला, पण काँग्रेसच्या नगरसेवकांना जमिनीवर बसण्याची वेळ, पहिल्याच दिवशी रितू तावडेंना घेरलं

BMC Mayor Election : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तारोहणाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congrss) आणि ठाकरे गटाच्या (Shivsen UBT) नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झालीय.

BMC Mayor Election BJP Vs Congrss Shivsen UBT : मुंबईत भाजपचं सत्तारोहन झालं असून भाजपच्या रितू तावडे (Ritu Tawde) या महापौरपदी तर उपमहापौरपदी संजय घाडी (Sanjay Ghadi) असे महायुतीचे दोन शिलेदार विराजमान झाले आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पालिकेची सत्ता हस्तगत केल्यानंतर बुधवारी भाजपचा महापौर (BMC Mayor) विराजमान झाला. असे असताना, सत्तारोहणाच्या आजच्या पहिल्याच दिवशी भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congrss) आणि ठाकरे गटाच्या (Shivsen UBT) नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांना घेरल्याचे चित्र आहे. (Mumbai Mahangarpalika Election 2026) 

सभागृहात बसायला जागा नाही, या मुद्द्यावर काँग्रेसचे नगरसेवक थेट व्यासपीठावर जात ठिय्या आंदोलन सुरु केलंय. महापौरांचे भाषण सुरू असताना काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठा शाब्दिक वाद सुरू झाला. काँग्रेसच्या नगरसेविकांकडून जागा द्या.. जागा द्या... अशा घोषणा देण्यात आल्या. तर यावर भाजपचे ही नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसून आलं.

BJP Vs Congrss Shivsen UBT :  'मुख्यमंत्र्यांची बहीण खुर्चीवर, लाडक्या बहिणी जमिनीवर'

'मुख्यमंत्र्यांची बहीण खुर्चीवर, लाडक्या बहिणी जमिनीवर' असं म्हणत काँग्रेसने सभागृहात आंदोलन सुरू केलंय. तर 'महिला महापौर, महिलांचाच अपमान' असा आशय कागदावर लिहून काँग्रेसने हे फलक सभागृहात झळकावले आहेत. महापौर यांचे भाषण सुरू असताना काँग्रेसने हे आंदोलन सुरू केलं. बसायला जागा नसल्याचे सांगत काँग्रेसच्या निवडून आलेल्या महिला नगरसेविका थेट जमिनीवर बसल्या आहेत. त्यामुळे सत्तारोहणाच्या आजच्या पहिल्याच दिवशी सभागृह काहीसं वादळी ठरल्याचे चित्र आहे.

BMC Mayor : '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

महापौर रितू तावडे यांच्या भाषणावेळी 'तानाशाही नही चलेगी' असं म्हणत काँग्रेसकडून नारेबाजी सुरू करण्यात आली. तर उपमहापौर संजय घाडी बोलत असताना '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा देत काँग्रेस नगरसेवक सभागृहातून बाहेर पडले आहेत.

सुरवातीला, भाजपच्या नगरसेवकांनी हुतात्मा चौक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर महायुतीचे सर्व नगरसेवक मुंबईत महानगरपालिकेत आले. पालिका सभागृहात महायुतीचे नगरसेवक आल्यानंतर जोरदार शंखनाद करण्यात आला. भाजपच्या महापौरांच्या सत्तारोहणाच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता. त्यांनतर मात्र गदारोळाने आज सभागृह दणाणून गेलंय.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप - 89
शिवसेना ठाकरे गट - 65
शिवसेना - 29
काँग्रेस - 24 
मनसे - 6 
एमआयएम- 8 
एनसीपी - 3 
एसपी - 2 
एनसीपी शप - 1

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
Embed widget