Eknath Shinde On BMC Mayor: कल्याण-डोंबिवलीत (Kalyan Dombivali Municipal Corporation) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हात सोडत मनसेचे नगरसेवक शिंदेंच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यामुळे आता मुंबईतही मनसे तोच कित्ता गिरवणार का, याची उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. त्यातच आता राजकारणात काहीही होऊ शकतं असं सावध विधान करत मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी चर्चेला एकप्रकारे हवा दिली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे.

मुंबईतही मनसेचा पाठिंबा घेणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जर आणि तर वर बोलण्यापेक्षा आता काय आहे, त्यावर बोला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले. (Eknath Shinde On Raj Thackeray MNS Yuti)

शिंदेंना सोबत घेऊन भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत- (BJP-Shivsena Yuti Mayor BMC Election 2026)

दरम्यान, मुंबईत बहुमताचा 114 आकडा एकाही पक्षाला ओलांडता आलेला नाही. भाजप 89, शिवसेना शिंदे गट 29, उद्धव ठाकरेंचे 65 आणि मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदेंना सोबत घेऊन भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. मात्र राज ठाकरेंच्या मनसेलाही सोबत घेत युती बेरजेचं राजकारण करणार की कोणती नवी खेळी करणार, हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार? (BMC Mayor BJP-Shivsena Shinde Group)

मुंबई महापालिका निवडणुकीत बाजी मारलेल्या भाजप-शिवसेना शिंदेंच्या पक्षांमध्ये पालिकेतील महत्वाच्या पदांबाबत अंतिम वाटाघाटी जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेकडून भाजपकडे महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी केली जात आहे. तर महत्वाच्या समित्यांपैकी शिवसेनेकडून सुधार किंवा शिक्षण समितींची मागणी केली जात आहे. दरम्यान या वाटाघाटीत मुंबईत महापौर हा भाजपचा बसल्यास शिंदेंच्या शिवसेनेला स्थायी समिती अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून सुधार समिती, बेस्ट आणि आरोग्य समिती स्वत:कडे ठेवली जाणार असल्याचे कळते. तर त्या बदल्यात शिवसेनेला शिक्षण, विधी, बाजार, उद्यान समिती दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)

भाजप - 89शिवसेना ठाकरे गट - 65शिवसेना - 29काँग्रेस - 24 मनसे - 6 एमआयएम- 8 एनसीपी - 3 एसपी - 2 एनसीपी शप - 1 ————-एकूण- 227

एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय काय म्हणाले?, संपूर्ण PC, VIDEO:

संबंधित बातमी:

BMC Mayor 2026 Sheetal Gambhir Desai: ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून लढल्या, 125 मतांनी जिंकल्या; फडणवीसांकडून सभेत उल्लेख, आता मुंबईच्या महापौरपदासाठी आघाडीवर, कोण आहेत शीतल गंभीर?