BMC Mayor 2026 मुंबई: नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत (Mumbai Municipal Corporation Election 2026) भाजप महायुतीला जनतेनं कौल दिला. पण भाजप आणि शिंदेंची शिवसेना यापैकी कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेनं (BJP-Shivsena Shinde Group) सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबई महापालिकेतील भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक हे एक गट म्हणून नोंदणी करणार असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेत आणि पर्यायानं विविध समित्यांमध्ये बहुमताचं संख्याबळ आणखी भक्कम करण्यावर भाजपचा भर असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसंच भाजपला गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोदपद देण्याचा महायुतीच्या नेतृत्त्वाचा विचार आहे.
मुंबई महापालिकेत स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असल्याची माहिती याआधी हाती आली होती. त्यासाठी शिंदेसमर्थक नगरसेवक स्वतंत्रपणे कोकण भवनला नोंदणीसाठी जाणार होते. पण अचानक त्यांनी नोंदणीसाठी जाणं टाळलं आणि त्यानंतर महायुतीच्या वतीनं दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांच्या एकत्रित गटनोंदणीचा निर्णय झाला. त्यामुळं मुंबई महापालिकेतल्या समिती प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी युतीनं ही खेळी खेळल्याची चर्चा आहे. (BMC Mayor)
मुंबईच्या महापौर निवडणूक रखडली- (Mumbai Mayor 2026)
मुंबईत महापौर पदाची निवडणूक कधी होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पार पडून नगरसेवक निवडून आले असले, तरी महापौर निवडीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.यामागचं मुख्य कारण म्हणजे भाजप आणि शिवसेना दोन मोठ्या पक्षांची गटनोंदणी अजून पूर्ण झालेली नाही. नियमांनुसार अधिकृत गटनेते, उपगटनेते आणि व्हीप यांची नोंद झाल्याशिवाय महापौर निवडीची पुढील प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही.
प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक- (BJP-Shivsena Shinde Group BMC Mayor)
गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतरच पालिका प्रशासन महापौर निवडणुकीची अधिसूचना आणि मतदानाचं वेळापत्रक जाहीर करणार आहे.म्हणूनच सध्या राजकीय चर्चा सुरू असल्या, तरी मुंबईला नवा महापौर मिळण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे. महापौर निवडीचा काउंटडाऊन सुरू होण्यासाठी अजून दोन्ही प्रमुख पक्षांकडून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतरच मुंबईला नवा महापौर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)
भाजप- 89शिवसेना ठाकरे गट- 65शिवसेना- 29काँग्रेस- 24 मनसे- 6 एमआयएम- 8 एनसीपी- 3 एसपी- 2 एनसीपी शप- 1 ————एकूण- 227
