एक्स्प्लोर

BMC Improvements Committee Members: घोसाळकर, जाधव, शर्मा, नार्वेकर, खान...; मुंबई महापालिकेच्या समित्यांवर कोणाकोणाला संधी?, A टू Z माहिती

BMC Improvements Committee Members: मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध समित्यांच्या सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. 

BMC Improvements Committee Members: मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध समित्यांच्या सदस्यांची निवड जाहीर (BMC Improvements Committee Members) करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) शिक्षण, स्थायी, सुधार आणि बेस्ट या चार महत्त्वाच्या वैधानिक समित्यांवरील नियुक्त्यांमधून राजकीय समतोल साधतानाच पक्षांतर्गत समीकरणे आणि नातेवाईकांना दिलेल्या संधीची चर्चा रंगली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांची सुधार समितीवर तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राखी जाधव यांची स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले चंदन शर्मा यांनाही सुधार समितीवर स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्या नेत्यांना महत्त्वाच्या समित्यांवर संधी देण्यात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (BMC Election 2026)

महापौरपदाच्या चर्चेत असलेल्या राजेश्री शिरवडकर यांना शिक्षण समितीवर पाठवण्यात आले आहे. याशिवाय शिक्षण आणि बेस्ट समित्यांवर नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करत काही बिगर नगरसेवकांचेही पुनर्वसन करण्यात आले आहे. दरम्यान, काही प्रभावी नेत्यांच्या नातेवाईकांनाही समित्यांवर संधी देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांना स्थायी समितीवर पाठवण्यात आले आहे. एकूणच, समित्यांवरील या नियुक्त्यांमधून अनुभवी सदस्यांना संधी देतानाच पक्षांतर्गत संतुलन राखणे, नव्याने आलेल्या नेत्यांना बळ देणे आणि काही ठिकाणी नातेवाईकांनाही स्थान देणे अशी राजकीय मांडणी दिसून येत आहे.

शिवसेना (शिंदे)–राष्ट्रवादी आघाडी मजबूत; दोन्ही गटांना समित्यांवर संधी- (Shivsena Shinde Group And NCP BMC Election 2026)

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तेच्या समीकरणात महत्त्वाची घडामोड पाहायला मिळाली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा) पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष या दोन्ही गटांनी एकत्र येत संयुक्त गट स्थापन केला होता. आता या आघाडीचा परिणाम समित्यांच्या नियुक्त्यांमध्येही दिसून आला आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे मिळून चार नगरसेवक असून त्यांनाही विविध महत्त्वाच्या समित्यांवर संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या डॉ. सईदा खान यांची स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थायी समिती आर्थिक निर्णयांसाठी महत्त्वाची- (BMC Improvements Committee Members)

स्थायी समिती ही आर्थिक निर्णयांसाठी महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे ही नियुक्ती राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे. तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे अजित रावराणे यांना सुधार समितीवर पाठवण्यात आले आहे. शहरातील विकासकामे आणि पायाभूत सुविधांशी संबंधित निर्णय सुधार समितीमार्फत घेतले जातात. महानगरपालिकेतील सत्ताधारी समीकरण अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये समन्वय साधत या नियुक्त्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात समित्यांमधील कामकाज आणि निर्णयप्रक्रियेवर या आघाडीचा प्रभाव दिसून येणार आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

BMC : एकच नगरसेवक असतानाही 'या' पक्षाची सुधार समितीमध्ये वर्णी, शिंदेंच्या शिवसेनेसोबत सहयोगी गट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amol Mitkari : अजित पवारांच्या विमानातील क्रू मेंबर पिंकी मालीच्या आईची अमोल मिटकरींनी घेतली भेट; नेमकं कारण काय?
अजित पवारांच्या विमानातील क्रू मेंबर पिंकी मालीच्या आईची अमोल मिटकरींनी घेतली भेट; नेमकं कारण काय?
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
फायनलच्या एकदिवसाआधी सचिनचा फोन, विश्वचषक जिंकल्यानंतर संजू सॅमसनने सांगितलं गुपित, सगळं बोलताना भावूकही झाला, काय म्हणाला?
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?
Wardha Crime: वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाच्या नेत्याशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
वर्ध्यात राजकीय नेत्याकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण, अजितदादा गटाशी कनेक्शनमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Embed widget