Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Mumbai Hawkers ID Card: मुंबईतील फेरीवाल्यांना 10 जूनपासून QR कोड ओळखपत्रांचे वाटप होणार आहे. मात्र फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच(Mahayuti) एकमत नसल्याचे समोर आलं आहे.

Mumbai Hawkers ID Card: मुंबईतील 99,435 पात्र फेरीवाल्यांना 10 जूनपासून QR कोड ओळखपत्रांचे वाटप होणार आहे. मुंबई महापालिकेने (BMC) या संदर्भात निर्णय जारी केला आहे. मात्र फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच(Mahayuti) एकमत नसल्याचे समोर आलं आहे. मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना QR कोड आधारित ओळखपत्र देण्याच्या निर्णयावरून महायुतीतच विसंवाद असल्याचे उघड झालं आहे. दोन दिवसांपूर्वी महापौर रितू तावडे (Ritu Tawde) यांनी QR ओळखपत्र वाटपाचे श्रेय घेत स्वागत केले होते. मात्र त्याच भाजपचे स्थायी समिती सदस्य तेजिंदर तिवाना यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत या प्रक्रियेवरच हरकत घेतली.
दरम्यान, घुसखोर आणि बनावट कागदपत्रांच्या पार्श्वभूमीवर QR ओळखपत्र वाटप धोकादायक ठरू शकते, असा तिवाना यांचा दावा आहे. तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे) कडून या निर्णयाला ठाम पाठिंबा देण्यात आला आहे. "पात्र फेरीवाल्यांना ओळखपत्र मिळालेच पाहिजे," अशी भूमिका गटनेते अमेय घोले यांनी घेत या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. अशातच स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी तिवाना यांचा हरकतीचा मुद्दा फेटाळून लावलाय. त्यामुळे या निर्णयावर आता नेमकं काय होतं, हे पुढे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Mumbai Hawkers ID Card: 10 जूनपासून 99,435 पात्र फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्रांचे वाटप होणार
महापौर रितू तावडे, भाजपचे तेजिंदर तिवाना, शिवसेनेचे अमेय घोले आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. मुंबई महापालिका हद्दीतल्या नोंदणीकृत 99 हजार 435 फेरीवाल्यांना क्यूआर कोड ओळखपत्र मिळणार आहे. येत्या 10 जूनपासून महापालिकेच्या विभाग कार्यालयांतून या क्यूआर कोडयुक्त ओळखपत्रांचं वितरण करण्यात येईल. उपमहापौर संजय घाडी, शिवसेना गटनेते अमेय घोले आणि शिवसेना नेते संजय निरुपम यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. मुंबईतल्या कायदेशीर फेरीवाल्यांवर गेल्या काही महिन्यांपासून अन्यायकारक कारवाई होत असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. न्यायालयानं प्रतिबंधित केलेली 20 ठिकाणं वगळता फेरीवाला क्षेत्रं घोषित करण्याची शिवसेना शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांकडे मागणी केली. टाऊन वेंडिंग समितीची लवकर अंमलबजावणी करण्याबाबतही आयुक्तांकडे मागणी करण्यात आली. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या समितीत अशासकीय सदस्यांची नियुक्ती होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'






















