BMC Election 2026: गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 123 मधील  राजकारण अत्यंत रंगतदार झाले आहे. वॉर्ड क्रमांक 123 हा शिवसेनेचा मजबूत गड म्हणून ओळखला जातो. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता राहिली आहे. ठाकरे गटाने या वॉर्डमधून सुनील मोरे (Sunil More) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ठाकरेंना शह देण्यासाठी या वॉर्डमधून शिंदे गटाकडून माजी नगरसेविका डॉ. भारती सुबोध बावदाणे यांना उमेदवारी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, भाजपचे स्थानिक आमदार राम कदम (MLA Ram Kadam) यांनी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावून वॉर्ड क्रमांक 123 भाजपसाठी सोडायला लावला. त्यामुळे या जागेवरुन भाजपच्या अनिल निर्मळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. शिंदे गटाच्या भारती बावदाणे आणि त्यांचे पती सुबोध बावदाणे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून वॉर्ड क्रमांक 123 मध्ये ग्राऊंड लेव्हलला कामाला सुरुवात केली होती. त्यामुळे साहजिक ही जागा भाजपला सुटल्याने भारती बावदाणे या प्रचंड नाराज झाल्या. त्यामुळे भारती बावदाणे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 

Continues below advertisement

भारती सुबोध बावदाणे यांचा मुंबई निवडणूक समितीचे अध्यक्ष नवाब मलिक, आमदार सना मलिक व मुंबई सरचिटणीस राजू घुगे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना वॉर्ड क्रमांक 123 मध्ये उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या अनिल निर्मळे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. हा वॉर्ड पूर्वापार शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाची याठिकाणी चांगली ताकद आहे. या भागात शिवसेनेला मानणारा मोठा मतदारवर्ग आहे. या जागेवर शिंदे गटाचा उमेदवार नसल्याने ही मतं ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही वॉर्ड क्रमांक 123 मध्ये शिवसेनेच्या तुलनेत भाजपला फारशी मतं मिळाली नव्हती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आमदार राम कदम काहीतरी चमत्कार करुन वॉर्ड क्रमांक 123 मधून भाजपचा उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी ठरणार का, हे आता पाहावे लागेल. 

Mumbai Election 2026: शिवसेना आमदाराच्या मुलासाठी मुंबईतील तीन वॉर्डमध्ये अदलाबदली

Continues below advertisement

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना सोमवारी रात्री मुंबईत वॉर्ड क्रमांक 3, वॉर्ड क्रमांक 4 आणि वॉर्ड क्रमांक 5 मधील उमेदवारीवरुन प्रचंड रस्सीखेच सुरु होती. शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला उमेदवार देण्यासाठी तीन वॉर्डमध्ये अदलाबदली करावी लागली. आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासाठी दोन उमेदवारांचे वॉर्ड बदलण्यात आले. वॉर्ड क्रमांक 3वर शिवसेनेचे संजय घाडी, तर भाजपच्या प्रकाश दरेकर यांच्यात रस्खीखेच सुरु होती. हे दोघेही वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छूक होते. मात्र, वॉर्ड क्रमांक 3मध्ये प्रवीण दरेकर यांच्या भावाला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संजना घाडी यांना नाईलाजाने वॉर्ड क्रमांक 4 मधून निवडणूक लढवावी लागणार आहे. तर आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सूर्वे याला वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. 

आणखी वाचा

एबी फॉर्म वाटताच मुंबईत नाराजीचा वणवा पसरला; ठाकरे बंधू, शिवसेना, भाजपमध्ये कोणी बंडखोरी केली?