BMC Shivsena UBT Sarita Mhaske: मुंबई महानगरपालिकेसाठी (BMC Election 2026) ठाकरेंच्या शिवसेनेच्या गट नोंदणीवेळी अनुपस्थित असलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के (Sarita Mhaske) मध्यरात्री पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या आहेत. काल दिवसभर त्यांना पक्षाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानंतर मध्यरात्री ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी त्या दाखल झाल्या आहेत.
मुंबईतील प्रभाग 157 मधून डॉ. सरिता म्हस्के ठाकरेंच्या शिवसेना ठाकरे गटाच्या (Shivsena UBT Mumbai Municipal Corporation Election 2026) तिकीटावर निवडून आल्या होत्या. मात्र त्या नंतर नॉट रिचेबल झाल्या होत्या. त्या शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली. आता त्या पुन्हा पक्षाच्या संपर्कात आल्या आहेत, दरम्यान नेमकं काय घडलं होतं? याचं स्पष्टीकरण त्या स्वतःच देणार आहेत. आज सकाळी 11 वाजता मिलिंद नार्वेकर हे सरिता मस्के यांना घेऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. यानंतर सरिता म्हस्के गट नोंदणीसाठी कोकण भवन येथे जातील, अशी माहिती समोर आली आहे. (Shivsena UBT Sarita Mhaske)
नेमकं प्रकरण काय? (BMC Shivsena UBT Sarita Mhaske)
सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली होती. सेना भवनातील नगरसेवकांच्या बैठकीला डॉ. सरिता म्हस्के गैरहजर राहिल्या. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गट नोंदणीवेळी देखील सरिता म्हस्के अनुपस्थित होत्या. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. मुंबईत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. एकीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी चढाओढ असताना दोन्ही गटांकडून इतर नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात ठाकरेंच्या एक नगरसेविका शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आली होती. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेलेल्या सरिता म्हस्के पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के यांनी प्रभाग क्रमांक 157 मधून भाजपच्या आशा तायडे यांचा पराभव केला आहे.
कोण आहेत सरिता म्हस्के? (Who is Sarita Mhaske?)
डॉ.सरिता रवींद्र म्हस्के मुंबईतील वार्ड क्रमांक 157 मधून शिवसेना ठाकरे पक्षाच्या नगरसेविका आहेत. त्यांचे, पती रविंद्र म्हस्के हे चांदिवलीमधील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. तर, 2017 मध्ये डॉ. सरिता म्हस्के यांनी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली होती, त्यावेळेस अवघ्या 400 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी, येथून शिवसेना पक्षाचा आकांक्षा शेट्टे निवडून आल्या होत्या. त्यांनतर म्हस्के यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, 2025 साली भाजपमधून शिंदेंच्या शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश केला. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात भाजपने ही जागा स्वत:कडे ठेवली, तसेच पुन्हा आकांक्षा शेट्टे यांना उमेदवारी दिल्याने म्हस्केंनी शिंदेंच्या शिवसेनेची साथ सोडली. तसेच, शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करीत मातोश्रीवर जाऊन नगरसेवक पदाची उमेदवारी घेतली. शिवसेना पक्षाच्या मशाल चिन्हावर सरिता म्हस्के विजयी झाला, त्यांनी भाजपच्या आकांक्षा शेट्टे यांचा पराभव केला.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)
भाजप - 89शिवसेना ठाकरे गट - 65शिवसेना - 29काँग्रेस - 24 मनसे - 6 एमआयएम- 8 एनसीपी - 3 एसपी - 2 एनसीपी शप - 1 ————-एकूण- 227
संबंधित बातमी:
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
