Ameet Satam BMC Fund: गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर असलेली शिवसेनेची सत्ता हटवून पालिकेत विराजमान झालेल्या सत्ताधारी भाजपच्या (BJP) कारभाराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेवर (BMC) एकहाती आणि संपूर्ण नियंत्रण मिळाल्याने आता भाजप नगरसेवकांना भरभरुन निधी मिळणार, असे अनेकांना वाटले होते. मात्र, भाजपची सत्ता येऊनही पक्षाच्या विशिष्ट नगरसेवकांना (Mumbai Coroporaters) निधीवाटपात झुकते माप दिले जात असल्याची कुजबूज सध्या भाजपच्या अंतर्गत वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Politics news)

Continues below advertisement

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील भाजपच्या नगरसेवकांमध्ये निधीचे समान वाटप होत नसल्याची तक्रार आहे. केवळ मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम (Ameet Satam) यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात सुरु आहे. अमित साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. केवळ साटम यांच्या मतदारसंघात निधीची खैरात केल्याने भाजप नगरसेवकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. परिणामी निधीवाटपाच्या निकषांबाबत आता भाजपमध्येच प्रश्न उपस्थित केले जात असल्याची माहिती आहे. निधी वाटपात समतोल न ठेवता काही विशिष्ट मतदारसंघांना प्राधान्य दिलं गेलं का? असा सवाल पक्षांतर्गतच उपस्थित होत असल्याची चर्चा आहे. निधीचं वाटप राजकीय जवळीक आणि गटबाजीवर होतंय का? असा सवाल आता विरोधकही करू लागले आहेत. त्यामुळे आता यावरुन भाजपमध्येच गृहकलह रंगण्याची शक्यता आहे. यावर आता अमित साटम काही स्पष्टीकरण देतात का, हे बघावे लागेल.

Ameet Satam Mumbai BJP President: अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांना किती निधी?

Continues below advertisement

वॉर्ड क्रमांक ६५ - विठ्ठल बंदेरी- 6 कोटी

वॉर्ड क्रमांक  ६७ - दीपक कोतेकर- 6 कोटी 

वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड - 9 कोटी 

वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंग - 6 कोटी 

वॉर्ड क्रमांक  - अनिष मकवाणी - 6 कोटी 

वॉर्ड क्रमांक  - सुनीता मेहता - 6 कोटी

Mumbai news: मुंबई महानगरपालिकेची एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमार्फत वितरित करण्यात आलेल्या तब्बल 800 कोटींच्या विकासनिधीच्या वाटपाच्या मुद्द्यावरूनही वाद निर्माण झाला होता. भाजपने एकेकाळचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) (Shivsena UBT) नगरसेवकांना केवळ 25 लाखांचा निधी दिला आहे. तर प्रथमच निवडून आलेल्या एमआयएमच्या (MIM) आठ नगरसेवकांना किमान दोन ते तीन कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. याबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.

आणखी वाचा

BMC मधील 122 अभियंत्यांच्या बदल्या रद्द; भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर प्रशासनाचा यू-टर्न, नेमकं प्रकरण काय?

रात्री नाल्यात दगड माती टाकून दिवसा तोच गाळ म्हणून काढला; बोरीवली पश्चिममधील नाला साफसफाईचा कथित गैरप्रकार उघड, स्थानिकांचा गंभीर आरोप